गेल्या १० महिन्यांत रेल्वेने १५७.१२ कोटी रुपये दंड वसूल केला आहे. या कालावधीत दंडवसुलीच्या रक्कमेत मागील वर्षापेक्षा ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात सुमारे १.०२ लाख विनातिकीट प्रवासी आढळले आहेत.भारतात वाहतुकीसाठी सर्वात सुरक्षित आणि स्वस्त साधन म्हणून रेल्वेची ओळख आहे. वंदे भारतमुळे रेल्वेची सेंकड जनरेशन सुरु झाली. प्रवाशांच्या पसंतीला ही ट्रेन आली. रेल्वे प्रशासन प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न करत असताना रेल्वेतून विनातिकीट प्रवास करणारे प्रवाशी वाढले आहेत. फुकट्या प्रवाशांमुळे रेल्वेच्या तिजोरीत तब्बल १५७ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे.
मुंबईत पश्चिम रेल्वेवर विनातिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी स्थानक, पुलांवर फोर्टेस तिकीट तपासणीसह रेल्वेगाड्यांमध्येही तिकीट तपासणी मोहीम तीव्र करण्यात आली आहे. मोहिमेच्या जोरावर गेल्या दहा महिन्यांत फुकट्या प्रवाशांकडून १५७ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे.एक लाख जण विनातिकीट
फेब्रुवारी महिन्यात मुंबई उपनगरी विभागांत सुमारे १.०२ लाख प्रवासी विनातिकीट आढळून आले. उन्हाचा तडाका वाढल्याने वातानुकूलित लोकलमध्ये ही विनातिकीट प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत ही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मुंबई लोकलमधून फुकट प्रवास करणाऱ्यांकडून रेल्वे प्रशासनाने ६.४३ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या एप्रिल ते फेब्रुवारीदरम्यान ५६ हजार अधिक विनातिकीट प्रवासी पकडण्यात आले आहे. यामुळे दंडवसुलीच्या रकमेत ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे
दहा महिन्यात १५७.१२ कोटी दंड
गेल्या १० महिन्यांत रेल्वेने १५७.१२ कोटी रुपये दंड वसूल केला आहे. या कालावधीत दंडवसुलीच्या रक्कमेत मागील वर्षापेक्षा ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात सुमारे १.०२ लाख विनातिकीट प्रवासी आढळले आहेत. या प्रवाशांकडून ६.४३ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.उद्या रेल्वेचा कामाचा शुभारंभ
मंगळवारी १२ मार्चला रेल्वेच्या वेगवेगळ्या कामांच लोकार्पण होणार आहे. शिवाय ९०० हून अधिक कामांच भूमीपूजन होणार आहे. महाराष्ट्रातील ५०० ठिकाणीच लोकार्पण तसेच भूमीपूजन होणार आहे. पुण्यात लातूरला महत्त्वाचे प्रकल्प हाती घेण्यात आलेले आहेत. आता ट्रेनची संख्याही वाढवण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर कलबूर्गी स्टेशन ते विश्वेस्वरया टर्मिनस अशी आणखी एक वंदे भारत सुरु होणार आहे.