Friday, November 14, 2025
Homeराजकीय घडामोडी5 वर्ष धान्य मोफत, औषधे 80 टक्के स्वस्त : भाजपची घोषणा

5 वर्ष धान्य मोफत, औषधे 80 टक्के स्वस्त : भाजपची घोषणा

भारतीय  जनता पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध झाल्या. त्यात गरीबांना पुढील ५ वर्ष मोफत धान्य मिळणार आहे. जेनरीक औषधी ८० टक्के स्वस्त देण्यात येणार आहे, ही आश्वासने आहे. तसेच ७० वर्षांवरील लोकांसाठी भाजपने मोठी घोषणा केली आहे. ७० वर्षांवरील प्रत्येक व्यक्ती आयुष्यमान भारत योजनेत आणण्यात येणार आहे. प्रत्येकाला पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळणार आहे. गरीबांसाठी आणखी तीन कोटी घरे बांधण्याची योजना आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप जाहीरनामा प्रसिद्ध करताना सांगितले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी लोकसभा निवडणूक 2024 साठी भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. त्याला ‘मोदी की गारंटी’ हे नाव देण्यात आले आहे. जाहीरनामा प्रसिद्ध करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 जानेवारी 2024 रोजी निवडणूक जाहीरनाम्यासाठी जनतेकडून सूचना मागवल्या होत्या. त्यानंतर 15 लाखांपेक्षा जास्त सूचना आल्या होत्या

बातमी अपडेट होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -