मागच्या काही दिवसांपासून कोल्हापूर विधानपरिषदेसाठी काँटे की टक्कर लढत होणार अशी चर्चा सुरू होती. परंतु कोल्हापूर विधान परीषद बिनविरोध करण्यावर शिक्कामोर्तब झाले. सतेज पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. वरिष्ठांच्या निर्देशप्रमाणे अमल महाडिक हे आपल्या समर्थकांसह आज (दि.२६) जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज मागे घेण्यासाठी पोहोचले.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दिल्लीत बैठक झाली. त्यानुसार कोल्हापूर विधान परिषदेतील भाजपचे उमेदवार अमल महाडिक व डमी उमेदवार शौमिका महाडिक यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सूचना भाजपकडून करण्यात आली. परिणामी काँग्रेसचे उमेदवार व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोल्हापूर विधान परिषद निवडणुकीत बिनविरोध निवड झाली.
उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना अमल महाडिक यांनी आपली पहिली प्रतिक्रीया दिली, मी भाजपचा सच्चा निष्ठावंत कार्यकर्ता आहे.मला पक्षाकडून आदेश आल्याने विधान परिषदेची निवडणूक लढवत होतो.