हिवाळ्यात अनेक हिरव्या भाज्या बाजारात येतात. ज्या आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. या हिरव्या भाज्यांमध्ये मुळ्याचा समावेश होतो. मुळा खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. केवळ मुळाच नाहीतर मुळाची पाने देखील आपल्या आरोग्यासाठी गुणकारी आहेत.
मुळ्याच्या पानांमध्ये पुरेशा प्रमाणात फायबर आढळते. जे पोटासाठी खूप फायदेशीर आहे. मुळ्याच्या पानांपासून तयार केलेले पेय सेवन केल्यास पचनाची समस्या दूर करण्यास मदत होते.
जर रक्तदाबाची समस्या असेल तर रक्तदाबाच्या रुग्णांसाठी मुळ्याच्या पानांचे सेवन खूप फायदेशीर मानले जाते. मुळ्याच्या पानांमध्ये सोडियमचे प्रमाण चांगले असते, जे शरीरातील मीठाची कमतरता भरून काढण्यास मदत करते.
वजन कमी करण्यासाठी देखील मुळ्याची पाने अत्यंत फायदेशीर आहेत. आपण दररोज सकाळी मुळ्याच्या पानांचा रस पिला पाहिजे. ज्यामुळे लठ्ठपणाची समस्या दूर होण्यास मदत मिळते.