Sunday, December 22, 2024
Homeराजकीय घडामोडीविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी घेतला मोठा निर्णय

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी घेतला मोठा निर्णय

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्मान सेना (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईत मनसेच्या कोअर ग्रुपची महत्त्वपूर्ण बैठक झाली.

मनसे आगामी विधासभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा देखील या बैठकीत घेण्यात आला.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. सर्व पक्षांनी आपापल्या पद्धतीने निवडणुकीच्या तयारीला सुरूवात केली आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी (24जून) मुंबईत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. मनसे आगामी विधासभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये ही बैठक पार पडली. या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजची बैठक असल्याचे राज ठाकरे यांनी यावेळी माहिती दिली. जुलैमध्ये आपण महाराष्ट्र दौरा करणार असल्याचेही राज यांनी सांगितले.

राज ठाकरे यांनी मारून नेली वेळ

मनसेकडून विधानसभेच्या 288 जागांचा सर्वे करण्यात येत आहे. अद्याप 88 जागांचा सर्वे रिपोर्ट प्राप्त झाला असून या जागांसाठी संभावित उमेदवारांच्या नावाची चाचपणी देखील सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. यावर विधानसभा निवडणुकीत नेमक्या किती जागांवर मनसे उमेदवार देणार? अशा प्रश्नाला मात्र राज ठाकरे यांनी वेळ मारून नेली. वेळ आली की तुम्हाला कळेलच, असे राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

महायुतीसोबत की ‘एकला चलो रे’वर चर्चा सुरू

लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेने महायुतीला पाठिंबा दिला होता. मात्र, आगामी विधानसभा निवडणूक महायुतीसोबत लढायची की स्वतंत्र लढायची याबाबत पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे.

जुलै महिन्यात महाराष्ट्र दौरा करणार

येत्या जुलै महिन्यात राज ठाकरे महाराष्ट्र दौरा करणार आहेत. यावेळी राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे देखील असण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अमित ठाकरे यांची महत्त्वाची भूमिका असणार आहे.

हे विष महाराष्ट्रात कधी नव्हतंच…

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन दोन गट पडले आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील तर ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी प्रा.लक्ष्मण हाके आंदोलन करत आहे. मराठा विरुद्ध ओबीसी असे चित्र निर्माण झालं आहे. यावर राज ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. राज ठाकरे म्हणाले, हे विष महाराष्ट्रात कधी नव्हतंच. जातीपातीचं विष कालवण्याचा प्रयत्न होत आहे. आता विष शाळा-महाविद्यालयांपर्यंत पोहोचलं आहे. असं विष कारवणाऱ्यांना महाराष्ट्रापासून दूर ठेवा, असा सल्ला राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -