इचलकरंजी:
महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य व स्वावलंबन, आरोग्य व पोषणासहित सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाच्या वतीने ’मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरु करण्यात आल्याबद्दल ताराराणी पक्ष महिला आघाडीच्या वतीने या निर्णयाचे स्वागत करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
महिलांचे सक्षमीकरण, हेच महायुती सरकारचे धोरण या उद्देशानुसार राज्य शासनाकडून महिलांसाठी विविध योजना जाहीर करुन त्याची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. तर पावसाळी अधिवेशनातील अर्थसंकल्पात ’मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरु करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या अंतर्गत 21 ते 60 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा 1500 रुपये देण्यात येणार आहेत. अर्थसंकल्पात ’मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ची घोषणा केल्याबद्दल ताराराणी महिला आघाडीच्या वतीने कॉ. मलाबाद चौक येथे साखर वाटप करून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. तसेच फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी ताराराणी महिला आघाडीच्या अध्यक्षा उर्मिला गायकवाड, कार्याध्यक्षा नजमा शेख, सपना भिसे, सीमा कमते, पूजा पोटे, पुनम पोटे, सुरेखा लोखंडे, पूजा इंगवले, अश्विनी हेगडे, आरती शिंगाडे, मंगल बुचडे, सरिता खाडे, उर्मिला शिंगाडे, अर्चना केंगार, प्रियांका पोटे यांच्यासह ताराराणी महिला आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्या उपस्थित होत्या.