ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते. ग्रहांचा राजा सूर्य ग्रहाला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागतो. जवळपास ३० दिवसांनंतर सूर्य १६ जुलै २०२४ रोजी कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे. तसेच कर्मफळदाता शनी ग्रह सध्या कुंभ राशीत विराजमान आहेत.
अशातच, सूर्य आणि शनी एकमेकांपासून सहाव्या आणि आठव्या घरात उपस्थित राहतील. ज्योतिषशास्त्रात सूर्य आणि शनीच्या या संयोगाला षडाष्टक योग म्हणतात. हा योग शुभ मानला जात नाही. त्यामुळे काही राशीच्या व्यक्तींसाठी या योगामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
षडाष्टक योगामुळे निर्माण होणार समस्या (Shadashtak Yoga)
कर्क
कर्क राशीच्या लोकांसाठी हा योग नकारात्मक परिणाम देणारा ठरेल. या काळात थोडे सावध राहणे आवश्यक आहे. या काळात अनेक समस्यांचा सामना करावा लागेल. या कर्क राशीच्या काही व्यक्तींना या काळात नोकरी बदलण्यासारखी परिस्थिती उद्भवू शकते. कामानिमित्त तुम्हाला खूप प्रवास करावा लागू शकतो. तुमच्या जोडीदाराशी काही मुद्द्यांवरून मतभेद होऊ शकतात. अशा स्थितीत वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात थोडे सावध राहण्याचा प्रयत्न करा.
कन्या
षडाष्टक योगामुळे कन्या राशीच्या लोकांच्या आयुष्यात काही समस्या उद्भवतील. कोणताही पैशांचा व्यवहार करण्यापूर्वी थोडा विचार करा. या काळात विनाकारण सर्व गोष्टींची चिंता सतावू शकते. कामात काही ना काही अडथळे येतील. या काळात कन्या राशीच्या काही व्यक्तींना आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. कुटुंबाबरोबर काही मुद्द्यांवरून वाद होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या रागावर थोडं नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा.
धनु
या काळात धनु राशीच्या व्यक्तींना आर्थिक नुकसान होण्याची शक्यता दाट असल्याने गुंतवणूक करताना सावधानता बाळगा. कामात अडथळे निर्माण होतील, वैवाहिक आयुष्यात कलह होतील, त्यामुळे मनात कोणतेही गैरसमज ठेऊ नका. करिअरमध्ये देखील तणाव निर्माण होईल. या काळात कोणालाही कर्ज देऊ नका.
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांसाठी हा योग अनुकूल ठरणार नाही. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना व्यवसायात काही समस्यांना सामोरे जावे लागेल. मित्रांमुळे काही अडथळे येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी दबाव जाणवू शकतो. याचबरोबर वरिष्ठांकडून अडचणी निर्माण होऊ शकतात. या काळात तुम्हाला मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक नुकसान होण्याचीही दाट शक्यता आहे.