Thursday, November 21, 2024
Homeइचलकरंजीमुलींना मोफत शिक्षण योजनेचा ताराराणी विद्यार्थी आघाडीतर्फे आनंदोत्सव

मुलींना मोफत शिक्षण योजनेचा ताराराणी विद्यार्थी आघाडीतर्फे आनंदोत्सव

 

इचलकरंजी

राज्य शासनाने चालू शैक्षणिक वर्षापासून उच्च शिक्षण घेणार्‍या मुलींना मोफत शिक्षण योजना सुरु केली आहे. या निर्णयाचा ताराराणी पक्ष विद्यार्थी आघाडीच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. आघाडीच्या वतीने शहरातील सर्वच महाविद्यालयात साखर वाटप करुन जल्लोष करण्यात आला.

चालू शैक्षणिक वर्षापासून मुलींना राज्य शासनाने उच्चशिक्षण मोफत देण्याची योजना जाहीर केली आहे. त्या निमित्ताने आमदार प्रकाश आवाडे व माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या मार्गदर्शनानुसार विद्यार्थी आघाडीच्या वतीने कै. दत्ताजीराव कदम सोसायटी टेक्स्टाईल इंजिनिअरिंग कॉलेज, यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक, श्री व्यंकटेश महाविद्यालय, डीकेएएससी कॉलेज येथे विद्यार्थीनींना साखर वाटप करुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष सुहास कांबळे, शहर अध्यक्ष फहिम पाथरवट, डिकेटीई कॉलेज विद्यार्थी आघाडी अध्यक्ष सुयश सुतार, सत्यशील खवरे, आदित्य सूर्यवंशी, अश्‍विनी भाटुंगे, भाग्यश्री हिट्टणी, मयुर डांगरे, गुंडु पुजारी, साई खाडे, दर्शन वाळंकुजे, अर्थव पाटील आदींसह पदाधिकारी व विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -