इचलकरंजी
यंत्रमाग अभ्यास समितीने सुचविल्याप्रमाणे महाराष्ट्र शासनामार्फत साध्या यंत्रमागाच्या सर्व प्रकारच्या कर्जावर ५% व्याज सवलत व शटललेस यंत्रमागाच्या सर्व प्रकारच्या कर्जावर २% व्याज सवलत देण्याच्या योजनेबाबत कर्जाची माहिती गोळा करणेचे काम सुरू केले असून इचलकरंजी व परिसरातील यंत्रमाग धारकांच्या कर्जाची रक्कम, त्याचे व्याज व ५% आणि २% प्रमाणे होणाèया व्याजाची रक्कम याच्या संकलनासाठी यंत्रमागधारकांचे प्रतिनिधी, राष्ट्रीयकृत, सहकारी, व्यावसायीक बँकांचे प्रतिनिधी तसेच वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी यांची मिटींग गुरूवार दि. ०८/०८/२०२४ इ.रोजी दुपारी १२.३० वाजता दि इचलकरंजी पॉवरलुम विव्हर्स को-ऑप. असोसिएशनच्या सभागृहात आयोजित केलेली आहे. यामिटींगसाठी राष्ट्रीयकृत, सहकारी, व्यावसायीक बँका व वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी यांनी विहीत नमुन्यातील माहितीसह या मिटींगला उपस्थित रहावे असे आवाहन दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहे.