Monday, December 23, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल होणार; राज्यात १२ ते १३ दिवस मुसळधार पावसाची...

महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल होणार; राज्यात १२ ते १३ दिवस मुसळधार पावसाची शक्यता

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर आता बऱ्यापैकी कमी झाला आहे. पुढील काही दिवस राज्यातील हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पण येत्या १९ ऑगस्टनंतर राज्यातील हवामाना मोठा बदल होण्याची शक्यता आहे.

 

राज्यात २० ऑगस्टनंतर पुढील १२ ते १३ दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे, अशी माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिली.

 

डख यांच्या अंदाजानुसार, एकंदरीत राज्यातील बहुतांशी भागात १९ ऑगस्टपर्यंत पावसाची उघडीप राहणार आहे. मात्र, त्यानंतर हवामान विभागात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, २० ऑगस्ट पासून पुढील बारा ते तेरा दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली. म्हणजेच सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाही मुसळधार पाऊस पडेल. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, अमरावती, अकोला, बुलढाणा, परतवाडा, अकोट, अचलपूर, वर्धा, नागपूर या भागात १७ ऑगस्टपर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस सुरू राहील. यामुळे या कालावधीत शेतकऱ्यांनी शेतीची सर्व प्रलंबित कामे पूर्ण करून घ्यावीत. महत्त्वाचे म्हणजे, जुलै महिन्याच्या सुरुवातील पावसाचा जोर कायम होता. परंतु, ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातील राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला.

 

देशातील हवामान

 

भारतीय हवामान शास्त्र विभागाने आपल्या ताज्या अंदाजात दिल्ली, केरळ, ओडिशा, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसह अनेक राज्यांमध्ये या आठवड्यासाठी पावसाचा इशारा दिला आहे. आयएमडीने आपल्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, दिल्ली आणि एनसीआर भागात २१ ऑगस्टपर्यंत वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस सुरू राहील. पुढील दोन दिवस कोणताही कलर कोड अलर्ट जारी करण्यात आलेला नसला तरी हवामान खात्याने १८ ते २० ऑगस्ट दरम्यान राष्ट्रीय राजधानीत यलो अलर्ट जारी केला आहे.

 

आग्नेय अरबी समुद्र आणि दक्षिण केरळ किनारपट्टीवरील चक्रीवादळामुळे राज्यात १५ ते १९ ऑगस्ट दरम्यान मुसळधार पाऊस पडेल, असे हवामान अंदाज संस्थेने म्हटले आहे. केरळ-लक्षद्वीप-कर्नाटक किनारपट्टी भागात १५ ते १९ ऑगस्ट या कालावधीत मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या संभाव्य कमी दाबाच्या क्षेत्रामुळे ओडिशात वादळी वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे, असेही आयएमडीने म्हटले आहे. शनिवार, १७ ऑगस्टपर्यंत मच्छिमारांनी समुद्रात जाणे टाळावे, असा इशाराही देण्यात आला आहे. आयएमडीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान आणि पूर्व उत्तर प्रदेशात आज तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -