Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी अशी करा E-KYC

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी अशी करा E-KYC

या योजनेकरीता प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या व मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे लाभार्थी कुटुंब पात्र ठरणार असल्याने लाभार्थी महिलांनी आपल्या गॅस एजन्सीमध्ये संपर्क करावा. तसेच या योजनेचा लाभ मिळण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी केले आहे.

 

अशी करा ई-केवायसी

 

ई-केवायसी कोणालाही त्यांचे खाते असलेल्या गॅस एजन्सीमध्ये जाऊन करता येईल. किंवा एच.पी.पे.या ॲपवरुन सेल्फ ई-केवायसी करता येते. ई-केवायसी ही एक साधी १ मिनिटाची प्रक्रिया आहे. ज्यासाठी फिंगरप्रिंट किंवा फेशियल व्हेरिफिकेशनव्दारे ग्राहकांचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण आवश्यक आहे.

 

कोणत्याही कंपनीच्या ग्राहकांनी गॅस रिफीलींग करीता ऑनलाईन बुकींग करावी. तसेच ३ गॅस सिलेंडरची रक्कम लाभार्थ्यांकडून गॅस एजन्सीमार्फत वसुल करण्यात येईल. त्याकरीता ग्राहकांनी गॅस ऐजन्सीकडून सिलेंडर खरेदी केल्यानंतर ३ गॅस सिलेंडरची रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये सबसिडीच्या स्वरुपात जमा होईल. या योजनेचा लाभ घेण्याकरीता महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन असणे आवश्यक आहे. कुटुंबप्रमुख अर्थात पुरूषाच्या नावावर गॅस कनेक्शन असेल तर ते ग्राह्य धरल्या जाणार नाही. त्यासाठी महिलेच्या नावावर कनेक्शन करावे लागणार आहे.

 

नागपुरात पुरवठा विभागात ५१ गॅस परवानाधारकनागपुर शहर पुरवठा विभागातील HPCL च्या एकूण २६ एजन्सी, BIPCL च्या एकुण ११ एजन्सीज IOCL च्या एकूण १४ एजन्सी अशा एकूण ५१ गॅस एजन्सी कार्यरत आहे. ई-केवायसी प्रक्रिया पुर्णपणे मोफत आहे. लाभार्थ्यांना काही अडचण असल्यास नागपुर शहर पुरवठा विभाग या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन अन्नधान्य वितरण अधिकारी विनोद काळे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -