म्हैसूर संस्थानाच्या शाही दसऱ्याप्रमाणे कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्याला खूप महत्त्व आहे. हा शाही दसरा सोहळा पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून नागरिक कोल्हापूरमध्ये येत असतात.
मावळतीच्या किरणांच्या साक्षीने आज करवीर संस्थानाचा शाही दसरा सोहळा पार पडला.
मावळतीच्या किरणांच्या साक्षीने करवीर संस्थानचा शाही दसरा संपन्न झाला.
सायंकाळी 6 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास हा दसरा सोहळा पार पडला.
म्हैसूर संस्थानाच्या शाही दसऱ्याप्रमाणे कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्याला खूप महत्त्व आहे.
हा शाही दसरा सोहळा पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून नागरिक कोल्हापूरमध्ये येत असतात.
छत्रपती घराण्यातील सर्व सदस्य मेबॅक कारमधून ऐतिहासिक दसरा चौकात पोहोचतात.
शमीचं पूजन झाल्यानंतर सोनं लुटण्याचा कार्यक्रम पार पडला.
यानंतर शाहू महाराजांनी कुटुबीयांसह करवीरवासियांची भेट घेतली.
विजयादशमी – दसरा सणानिमित्त हिल रायडर्स ग्रुपतर्फे प्रतिवर्षीप्रमाणे जुना राजवाड्याच्या नगारखाना या मुख्य प्रवेशद्वारास तांब्याच्या कलशाचे मंगल तोरण बांधण्यात आले.
ऐतिहासिक वास्तूंचे जतन व्हावे, आपला शौर्यशाली इतिहास आजच्या युवा पिढीला माहिती व्हावा, कोल्हापुरात येणार्या पर्यटकांना इतिहासाची माहिती व्हावी या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.