Thursday, October 17, 2024
Homeमहाराष्ट्रबिग बॉसमध्ये शिवीगाळ, मारामारीपर्यंत मजल; नेमकं काय घडलं?

बिग बॉसमध्ये शिवीगाळ, मारामारीपर्यंत मजल; नेमकं काय घडलं?

बिग बॉस हिंदीचा 18 वा सीझन दर्शकांसाठी खूप मनोरंजक ठरला आहे. दररोज या शोमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांचे वाद, भांडण होत असतात आणि गदारोळ माजतो. मागच्या एपिसोडमध्येही बराच हंगामा झाला. खरंतर 16 ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये अविनाश आणि चुम दरांग यांच्यात बरंच वाजलं. एवढंच नव्हे तर तो वाद एवढा वाढला की प्रकरणं अगदी शिवीगाळ आणि मारामारीपर्यंत पोहोचलं. काय झालं शोमध्ये… जाणून घेऊया..

 

घरातील स्पर्धक हे राशनसाठी आंदोलन करण्याचा निर्णय घेतात. त्यानंतर बिग बॉस घरात बेसिक राशन सामान पाठतात. मात्र अविनाश आणि सारा यांच्याव्यतिरिक्त कोणीच या राशनचा स्वीकार करत नाही. त्यानंतर बिग बॉस हे घरातील सर्व सदस्यांना एकत्र येण्यास सांगतात आणि त्यांना एक टास्क देतात. दोन स्पर्धकांना जेलमध्ये पाठवा किंवा मग एका कोणालातरी व्होट देऊन घराबाहेर करा, असं बिग बॉस सदस्यांना सांगतात. त्यानंतर अविनाश आणि चाहत या दोघांनाही प्रत्येकी 8-8 मतं मिळतात.

 

अरफीन आणि अविनाशमध्ये भांडण

 

यानंतर अविनाशचा अरफीन खानसोबत जोरदार वाद होतो आणि यादरम्यान त्यांचा संयम सुटतो, भांडता भांडता अरफीन खान अविनाशला ‘घटिया माणूस’ म्हणतो. त्यानंतर चुम दरांगदेखील अविनाशसोबत भिडते आणि त्यांचा वाद होतो, ती त्याला उद्धट म्हणते. त्यानंतर दोघांचाही वाद वाढता जातो आणि रागाच्या भरात ती अविनाशला सरळ शिवीच देते. पण हे ऐकन अविनाशतचं डोकं सटकतं आणि तो सरळ तिला मारण्यासाठी तिच्यावर धावून जातो, मात्र घरातले इतर लोक त्याला कसेबसे थोपवून धरतात

 

अविनाश शोबाहेर जाणार का ?

 

स्त्रियांवर कसला हल्ला करतोस,असं म्हणत अरफीन त्याला खडे बोल सुनावतो. मात्र ते ऐकून अविनाश अरफीनला वॉर्निंग देत शांत बसायला सांगतो. थोड्या वेळानंतर घरचे कसेबसे अविनाश आणि चुमचं भांडण थोपवतात, मारामारीही रोखतात. मात्र अविनाश अरफीनवर खूप भडकलेला दिसतो. तेव्हा ॲलिस आणि इशा अविनाशची समजूत काढत त्याला शांत करण्याचा प्रयत्न करतात. मात्र तरीही अविनाश भडकलेलाच असतो. ‘ माइंड फाड़ दूंगा मैं माइंड कोच का.’अशा शब्दांत तो राग व्यक्त करतो.

 

त्यानंतर शोच्या शेवटी बिग बॉसच्या ऑर्डरने सर्वांनाच धक्का बसतो. ते अविनाशला सांगतात की तू या क्षणी बेघर (घरातून बाहेर) होत आहेस. मात्र हे खरोखर होणार का दुसरा कोणता निर्णय घेतला जातो, हे पुढल्या भागतच समजेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -