Thursday, October 17, 2024
Homeमहाराष्ट्रऐन दिवाळीत मिठाचा खडा… रिझर्व्हेशनबाबत रेल्वेचा मोठा निर्णय काय?

ऐन दिवाळीत मिठाचा खडा… रिझर्व्हेशनबाबत रेल्वेचा मोठा निर्णय काय?

ऐन दिवाळीच्या मोसमात रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांना मोठा धक्का दिला आहे. रेल्वेच्या रिझर्व्हेशनबाबत ही बातमी आहे. रेल्वेने तिकीट बुकिंगच्या नियमात बदल केले आहेत. या नियमानुसार आता 120 दिवस आधी नव्हे तर 60 आधी तिकीट बुकिंग करता येणार आहे. रेल्वे मंत्रालयाने हा आज त्याबाबतचं नोटिफिकेशन जारी केलं आहे.

अॅडव्हान्स रिझर्व्हेशनची काल मर्यादा कमी करण्यात आली आहे. त्यामुळे आता 60 दिवस आधीच प्रवाशांना रिझर्व्हेशन करता येणार आहे. आरक्षण करण्याचा कालावधी कमी करण्यात आल्याने बुकिंगसाठी आता प्रवाशांची मोठी झुंबड उडण्याची शक्यता आहे.

 

रेल्वेच्या नोटिफिकेशननुसार, आता 1 नोव्हेंबर 2024 पासून रेल्वेत अॅडव्हान्स रिझर्व्हेशनची काल मर्यादा 120 दिवसांनी कमी करून 60 दिवसांची केली आहे. (प्रवासाची तारीख वगळून) 120 दिवसात एआरपीनुसार 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत करण्यात आलेल्या सर्व बुकिंग कायम ठेवण्यात आल्या आहेत.

 

यांना नियम लागू नाही

 

 

मात्र, रेल्वेने काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. ताज सारख्या काही दिवसांच्यासाठी चालणाऱ्या एक्सप्रेसबाबत हा नियम लागू नाही. एक्सप्रेस, गोमती एक्सप्रेससाठी पुढील आरक्षणाची मर्यादा कमी करण्यात आली आहे. तसेच विदेशी पर्यटकांच्या 365 दिवसांच्या मर्यादेमध्येही कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

 

अडचणी येऊ शकतात

 

दरम्यान, आधी सर्व प्रवाशांकडे 120 दिवस आधीच तिकिट बुक करण्याची संधी होती. त्यामुळे वेळ भरपूर असल्याने तिकीट बुक व्हायचं. वेटिंग तिकीट कन्फर्म होण्यासाठीही पुरेसा वेळ मिळायचा. आता 60 दिवसांचीच बुकिंग मर्यादा ठेवल्याने आरक्षण करण्यासाठी गर्दी वाढणार आहे. त्यातच वेटिंग तिकीट कन्फर्म होण्याचे चान्सेसही कमी होणार आहे. पूर्वांचल आणि बिहारच्या मार्गांवर चार महिने आधीच आरक्षण फुल व्हायचं. आता नियमात बदल केल्याने प्रवाशांची काय प्रतिक्रिया उमटते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

दललांवर कारवाई

 

तिकीट बुकिंग सहज सोपी व्हावी आणि सर्वांना तिकीट मिळावं म्हणून रेल्वेने सर्व प्रयत्न सुरू केले आहेत. अवैधपणे तिकीट बुक करून प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम वसूल करणाऱ्या दलालांना लगाम घालण्यासाठी रेल्वेने विशेष मोहीम हाती घेतली होती. प्रवाशांना चांगल्यातील चांगली सुविधा देण्यावर रेल्वेने भर दिला आहे. त्यामुळेच रेल्वेने ही मोहीम हाती घेतल्याचं सांगितलं जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -