राज्यात परतीच्या पावसाचा वेग वाढू शकतो. कारण पुढील २ दिवसात इचलकरंजी कोल्हापूर, मुंबई, ठाणे सह ५ जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतीला मोठा फटका बसू शकतो.
ऑक्टोबर महिना सुरू झाला असला तरी देखील पावसाचं सावट कायम आहे. ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस सुरु आहे. पण या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. काही ठिकाणी तापमानात चढ उतार होताना दिसत आहे. मुंबईमध्ये उष्णतेने लोकं हैराण झाले आहेत. कधी उष्णता तर कधी पाऊस असं चित्र आहे. मुंबईचे कमाल तापमान 32 डिग्री सेल्सिअसवर आहे. त्यातच पुढील दोन दिवस हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईसह ठाण्यात पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये हा ऊन सावलीचा खेळ पाहायला मिळणार आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार 17 ऑक्टोबरला पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती. कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता. कोकणामध्ये भात कापणीला आलेला असताना पावसाचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यात पुढचे दोन दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने पावसाचा अलर्ट दिला आहे. पाच जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
जालना, परभणी, हिंगोलीत देखील काही प्रमाणात पाऊस होत आहे. पण रविवारपर्यंत तो वाढण्याची शक्यता आहे. 18 आणि 19 ऑक्टोबर रोजी हवामान विभागाने हा पावसाचा इशारा दिला आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस झाला. आता परतीचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.