Friday, November 15, 2024
Homeइचलकरंजीआजपासून गृह मतदानाला सुरूवात

आजपासून गृह मतदानाला सुरूवात

भारत निवडणूक | आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सार्वत्रिक विधानसभा निवडणूकीत ८५ वर्षांवरील जेष्ठ आणि दिव्यांग मतदारांना त्यांच्या इच्छेनुसार गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देणेत आलेली आहे. या अनुषंगाने इचलकरंजी मतदारसंघातील गृह मतदान गुरुवार, १४ नोव्हेंबर ते

शनिवार१६ नोव्हेंबर या

कालावधीत होणार आहे.

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात दि. २९ ऑक्टोबर अखेर एकूण ३,१२,६६४ इतके मतदार संख्या आहे. यामध्ये १,५८,७२१ पुरुष मतदार तर १,५३,८८१ इतके स्त्री मतदार – असुन ६२ इतर ( तृतीयपंथी) मतदार आहेत. यापैकी १८ ते १९

■ १६ नोव्हेंबरपर्यंत चालणार प्रक्रिया ■ ८५ वर्षावरील मतदारांचा समावेश

या वयोगटातील ६२९९ इतके नवमतदार आहेत. मतदारसंघांमध्ये सैन्य दलात कार्यरत असलेले एकूण

१५९ मतदार असुन यापैकी १५२ पुरुष मतदार तर ७ स्त्री मतदार

आहेत.

मतदारसंघांमध्ये ८५ पेक्षा जास्त वय असलेले एकूण १९७३ मतदार असुन त्यापैकी १९४ मतदार गृह

मतदानासाठी इच्छुक आहेत. तसेच मतदारसंघात एकुण ५४२ दिव्यांग असुन त्यापैकी ३५ मतदार गृह • मतदानासाठी इच्छुक आहेत. गृह मतदानासाठी एकुण १४ पथके तयार करण्यात आलेली असून त्यापैकी दोन राखीव आहेत. तरी

गुरुवार पासून गृह मतदानासाठी | आपल्या घरी येणान्या गृह मतदाना पथकास सहकार्य करावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -