Tuesday, February 4, 2025
Homeतंत्रज्ञान50MP कॅमेरा, 7000mAh बॅटरीसह लाँच झाला Realme Neo 7 मोबाईल

50MP कॅमेरा, 7000mAh बॅटरीसह लाँच झाला Realme Neo 7 मोबाईल

रियलमीने आपला नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन रियलमी निओ 7 ( Realme Neo 7 ) लाँच केला आहे. या फोनमध्ये ग्राहकांना प्रीमियमचा अनुभव चांगला मिळावा, यासाठी वेगवेगळ्या आधुनिक तंत्रज्ञात वापर करण्यात आला आहे . तसेच या फोनची डिझाईन सगळ्यांच्या मनाला भावेल अशी करण्यात आली आहे. त्यामुळे हा फोन त्याच्या दमदार फीचर्स आणि उत्कृष्ट अनुभवासाठी ओळखला जात आहे . तर चला जाणून घेऊया रियलमी निओ 7 च्या फीचर्सची आणि किमतीची सविस्तर माहिती

 

Realme Neo 7 चे फीचर्स –

रियलमी निओ 7 मध्ये 6.78 इंच LTPO AMOLED चा डिस्प्ले असून , जो तुम्हाला 1.5K रिझोल्यूशन देतो. तसेच या डिस्प्लेमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 2600Hz टच सॅम्पलिंग रेट आहे. फोनची स्क्रीनची पीक ब्राइटनेस 6000 निट्स इतकी असून, उन्हातही स्क्रीन सहज वापरता येणार आहे. फोनच्या प्रोसेसर बदल बोलायचं झालं तर , याच्या हँडसेटमध्ये मीडियाटेक डिमेन्सिटी 9300+ प्रोसेसर आहे, जो उत्कृष्ट परफॉर्मन्स देतो. फोटो प्रेमींसाठी ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50 मेगापिक्सल Sony IMX882 प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे, ज्यात OIS सपोर्ट आणि f/1.9 अपर्चर आहे. त्याचबरोबर , 8 मेगापिक्सल अल्ट्रावाइड लेंस देखील आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा दिला आहे.

 

बॅटरी आणि कनेक्टिविटी –

बॅटरी आणि कनेक्टिविटीसाठी 7000mAh क्षमतेची मोठी बॅटरी मिळणार असून , जी दीर्घकालीन परफॉर्मन्ससाठी उपयुक्त आहे. तसेच कनेक्टिविटीसाठी 5G LTE, वाय-फाय, ब्लूटूथ आणि GPS यांसारखे फीचर्स यात दिले आहेत. त्याचसोबत हा फोन 12GB व 16GB RAM पर्यायांमुळे मल्टिटास्किंग, गेमिंग आणि ऍप्सचा वापर अधिक सोयीचा होतो. रियलमी निओ 7 मध्ये Android 15 बेस्ड Realme UI 6 सॉफ्टवेअर देण्यात आले आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना उत्तम युजर एक्सपीरियन्स मिळतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -