Wednesday, December 25, 2024
Homeमहाराष्ट्र…अन् एकनाथ शिंदे विनोद कांबळीच्या मदतीला धावले, उपचारासाठी उपमुख्यमंत्र्यांनी केली मोठी आर्थिक...

…अन् एकनाथ शिंदे विनोद कांबळीच्या मदतीला धावले, उपचारासाठी उपमुख्यमंत्र्यांनी केली मोठी आर्थिक मदत

माजी क्रिकेट विनोद कांबळी याची प्रकृती खालावली आहे, त्याला उपचारासाठी भिवंडी येथील आकृती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सध्या विनोद कांबळीकडे बीसीसीआयच्या पेन्शन व्यतिरिक्त उत्पन्नाचं दुसरं कोणतंही साधन नाहीये. अशाच उपचारावर होणारा एवढा खर्च कुठून करायचा असा त्याच्यासमोर प्रश्न आहे. मात्र एक दिलासादायक बातमी म्हणजे विनोद कांबळी उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी समोर येताच त्याच्या उपचारासाठी अनेक जण पुढे येत आहेत. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील विनोद कांबळीला मदत केली आहे.

 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विनोद कांबळीच्या उपचारसाठी पाच लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी विनोद कांबळी यांची भेट घेऊन, त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत ही मदत केली आहे. तसेच कांबळीच्या तब्येतीबाबत डॉक्टरांकडे चौकशी करून, उपचारात कोणतीही गोष्ट कमी राहणार नाही याची काळजी घ्या अशी विनंती देखील चिवटे यांनी केली आहे.

 

कांबळीने मानले आभार

 

दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विनोद कांबळीच्या उपचारासाठी पाच लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. या मदतीसाठी क्रिकेटपटू विनोद कांबळीने एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत, तसेच त्यांनी एकदा हॉस्पिटलमध्ये भेटण्यासाठी यावं अशी विनंती देखील त्याने केली आहे. लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे हे विनोद कांबळीची भेट देखील घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.

 

विनोद कांबळी या ना त्या कारणाने सतत चर्चेत असतो. नुकताच त्याचा सचिन सोबतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, या व्हिडीओमुळे तो पुन्हा चर्चेत आला. एका कार्यक्रमासाठी सचिन आणि विनोद कांबळी दोघे देखील आले होते. यावेळी त्याने सचिनची भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला खुर्चीवरून उठता देखील आले नाही, तर याच कार्यक्रमात त्याने आपले गुरू रमाकांत आचरेकर सर यांच्या आठवणीत एक गाणं म्हटलं होतं, तेव्हा देखील त्याचे शब्द अडखळत होते. त्यानंतर त्याला मदत करण्यासाठी अनेक जण पुढे आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -