संतोष देशमुख यांची हत्या आणि त्यांच्या छळाचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ इचलकरंजीत शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटाच्या वतीने महात्मा गांधी पुतळा चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी संशयित आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत संतप्त आंदोलकांनी वाल्मिक कराड याच्या प्रतिकात्मक फलकास जोडे मारले.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा मारेकऱ्यांनी अत्यंत निर्दयपणे व छळ करत मारहाण केली. त्याचे फोटो सोशल मीडिया आणि प्रसार माध्यमांत प्रसिध्द झाल्यानंतर सर्वच स्तरातून प्रचंड चीड आणि संतापाची लाट निर्माण झाली आहे. देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कडक शासन करावे अशा तीव्र भावना रविंद्र माने यांनी व्यक्त केल्या.
यावेळी महादेव गौड, महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ. वैशाली डोंगरे, सलोनी शिंत्रे, शकुंतला पाटील, दिप्ती लोकरे, श्रध्दा यवलुजकर, जोत्सना भिसे, उमा जाधव, समिक्षा कांबळे, उमा जाधव, स्नेहांकिता भंडारे, सोनाली आडेकर, गीता गाठ, मोहन मालवणकर, ऋषिकेश गौड, महेश ठोके, आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.