Monday, August 25, 2025
Homeकोल्हापूरदिवसा बँकेचा सुरक्षा रक्षक अन् रात्रीच्या वेळी घरफोड्या; कोल्हापूर पोलिसांनी सराईत आरोपीला...

दिवसा बँकेचा सुरक्षा रक्षक अन् रात्रीच्या वेळी घरफोड्या; कोल्हापूर पोलिसांनी सराईत आरोपीला ठोकल्या बेड्या, पुढं आला मोठा कारणामा

कोल्हापूर जिल्ह्याच्या गुन्हेगारी विश्वातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात दिवसा बँकेचा सुरक्षा रक्षक असलेल्या व्यक्तिचा प्रताप समोर आला आहे. जो दिवसा एक जवाबदार बँकेचा सुरक्षा रक्षक म्हणून वावरत होता. मात्र रात्रीच्या वेळी घरफोड्या करून अनेकांच्या पैशावर डल्ला मारत होता. सागर रेणुसेला असे या आरोपीचे नाव असून अखेर कोल्हापूर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

 

पुढे आलेल्या माहितीनुसार, पेट्रोल चोरी करताना लोकांना सापडलेल्या सागर कडून घरफोडीचे तब्बल 14 गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यामुळे कोल्हापूरच्या कसबा बावडा या ठिकाणी एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या हाती लागलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून तो गेली चार वर्ष घरफोड्या करत होता, हे समोर आले आहे. मध्यरात्री एकटाच घराच्या बाहेर पडत होता त्यामुळे त्याच्या चोऱ्यांबाबत कोणतेही रेकॉर्ड यापूर्वी मिळू शकले नव्हते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -