येथील झुलेलाल चौकातील सिंधी पुरुषार्थी हॉलसमोर ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. ही घटना रात्री सव्वानऊच्या सुमारास घडली. मारुती शामराव वाघमारे (रा. शामरावनगर, सांगली) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.
याबाबत विठ्ठल शामराव वाघमारे यांनी पोलिसांत फिर्याद असून, ट्रॅक्टरचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मृत मारुती वाघमारे हे शामरावनगरमध्ये राहतात. ते दुचाकीवरून झुलेलाल चौकातील सिंधी पुरुषार्थी हॉलसमोरून घराकडे निघाले होते. यावेळी त्यांच्या विरुद्ध बाजूने ट्रॅक्टर येत होता. ट्रॅक्टरने दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत वाघमारे यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, ट्रॅक्टरचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, तीन मुली, मुलगा असा परिवार आहे.