Saturday, July 26, 2025
Homeमहाराष्ट्रभारत-पाकिस्तानात तणाव, या वस्तू होऊ शकतात महाग

भारत-पाकिस्तानात तणाव, या वस्तू होऊ शकतात महाग

पहेलगाममध्ये 22 एप्रिल रोजी मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात पर्यटकांना लक्ष करण्यात आले. निरपराध नागरिकांवर गोळीबार करण्यात आला. यामध्ये 26 जणांना प्राण गमवावे लागले. तर अनेक लोक गंभीर जखमी झाले. त्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कडक धोरण घेतले.

 

सरकारने पहेलगाम हल्ल्यानंतर सिंधू पाणी करार रद्द केला. तर पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिसा रद्द करण्यात आला. पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले. तर पाकिस्ता सरकारचे अधिकृत खाते सुद्धा बॅन करण्यात आले.

 

पहेलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबतचे सर्वच संबंध संपुष्टात येत आहे. या ताणतणावाचा थेट परिणाम भारत आणि पाकिस्तानदरम्यान होणाऱ्या व्यापारावर दिसत आहे. दोन्ही देशांमध्ये व्यापार होतो. आता व्यापार बंद होणार असल्याने त्याचा परिणाम काही वस्तूंवर होणार आहे. या वस्तू महागण्याची शक्यता आहे.

 

नवीन वादामुळे ड्राय फ्रूटस महागण्याची शक्यता आहे. भारत पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात ड्राय फ्रूटस मागवतो. या नवीन घडामोडींमुळे भारतात ड्राय फ्रूटस महाग होण्याची शक्यता आहे.

 

सैंधव मीठ महाग होईल. भारत सैंधव मीठासाठी पाकिस्तानवर अवलंबून आहे. पाकिस्तानमध्ये सैंधव मीठ मोठ्या प्रमाणात मिळते. त्यामुळे भारतात सैंधव मीठ महागण्याची शक्यता आहे.

 

भारतात चष्म्यांसाठी वापरण्यात येणारी ऑप्टिकल लेंस पाकिस्तानमधून येते. येथील ऑप्टिकल्सची भारतीय बाजारात सर्वाधिक मागणी आहे. या नवीन घडामोडीमुळे भारतात ऑप्टिकल लेंस महाग होण्याची शक्यता आहे.

 

पाकिस्तानातून भारतात फळ, सिमेंट, मुलतानी माती, कापसाची आवक, स्टील आणि चामड्याचे सामान आयात होते. हे सर्व उत्पादनं पाकिस्तानातून भारतात येतात. पण आता या वस्तू महागण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -