Saturday, July 26, 2025
Homeमहाराष्ट्रउद्या बुधवारी महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये होणार मॉक ड्रील, वाचा मॉक ड्रील म्हणजे...

उद्या बुधवारी महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये होणार मॉक ड्रील, वाचा मॉक ड्रील म्हणजे नेमकं काय..

भारत-पाकिस्तान सीमारेषेवर वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ७ मे रोजी देशव्यापी मॉक ड्रिल (सुरक्षा सराव) घेण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंदर्भात सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना आदेश दिले आहेत.

 

दरम्यान, महाराष्ट्रात सुमारे १६ शहरांमध्ये मॉक ड्रील घेतली जाणार आहे.

 

मॉक ड्रिल का केली जात आहे?

 

• 1971 नंतर प्रथमच देशव्यापी नागरी सुरक्षा सराव

 

• युद्धसदृश परिस्थितीत नागरिकांचे संरक्षण, मालमत्तेची सुरक्षा आणि जनतेचे मनोबल कायम राखण्याचा प्रयत्न

 

• शिक्षण, सजगता आणि समन्वय वाढवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर सराव

 

कोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार मॉक ड्रिल?

 

• जम्मू-कश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात यासारख्या पाकिस्तान सीमेलगतच्या राज्यांतील 244 नागरी सुरक्षा जिल्हे

 

• निवडक जिल्ह्यांमध्ये संवेदनशील ठिकाणे – शहरांतील बाजारपेठा, सरकारी व प्रशासकीय इमारती, पोलिस ठाणी, फायर स्टेशन, सैन्य तळ, गर्दीची ठिकाणे

 

नागरी सुरक्षा कायदा आणि उद्दिष्टे

 

• नागरी सुरक्षा अधिनियम 1968 नुसार ही मॉक ड्रिल केली जात आहे

 

• उद्दिष्ट:

 

नागरिकांचे प्राण वाचवणे

 

सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान टाळणे

 

युद्ध किंवा आपत्ती काळात मनोधैर्य टिकवणे

 

सशस्त्र दलांना पाठबळ देणे

 

सायरन कसे वाजतात आणि काय करावे?

 

सायरन

 

120-140 डेसिबल आवाज, 2-5 किमीपर्यंत पोहोचतो

 

आवाजात सायक्लिक पॅटर्न (हळूहळू वाढतो व कमी होतो)

 

आपत्कालीन ठिकाणी – पोलीस, सैन्य ठाणे, बाजार, सरकारी कार्यालये

 

काय करावे?

 

आवाज ऐकताच सुरक्षित ठिकाणी जाण्यास सुरुवात करा

 

घाबरून जाऊ नका, सरकारी अलर्ट्सकडे लक्ष द्या

 

खुल्या जागांपासून दूर जा, बंद जागेत थांबा

 

कोण सहभागी होणार?

 

• जिल्हाधिकारी, पोलीस, प्रशासनिक यंत्रणा

 

• सिव्हिल डिफेन्स वॉर्डन्स व होम गार्ड्स

 

• कॉलेज-शाळांतील विद्यार्थी, NCC, NSS, NYKS सदस्य

 

महाराष्ट्रात कुठे होणार मॉक ड्रील

 

महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, उरण, तारापूर, थळ, सिन्नर, मनमाड, नाशिक, रोहा, नागोठणे अशा १६ ठिकाणी मॉक ड्रील पार पडणार आहे.

 

अफवांपासून सावध राहा

 

मॉक ड्रिल ही प्रशिक्षणाची प्रक्रिया आहे, ती खरी युद्ध किंवा हल्ला नाही. अफवांवर विश्वास ठेवू नका. केवळ अधिकृत सूचना पाळा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -