Sunday, July 27, 2025
Homeमहाराष्ट्रलाडक्या बहिणींना जूनमध्ये 2100 रु, डोनाल्ड ट्रम्प यांची अजितदादांशी चर्चा, रोहिणी खडसेंकडून...

लाडक्या बहिणींना जूनमध्ये 2100 रु, डोनाल्ड ट्रम्प यांची अजितदादांशी चर्चा, रोहिणी खडसेंकडून मीम्स शेअर

लाडकी बहिण योजना (Ladki Bahin Scheme) ही महायुती सरकारची अत्यंत महत्वकांक्षी योजना आहे. मात्र, या योजनेवरुन विरोधक सध्या महायुती सरकारवर जोरदार टीका करताना दिसत आहेत.

 

कारण, विधानसभा निवडणुकीच्यावेळी महायुतीच्या नेत्यांनी लाडकी बहिण योजनेची रक्कम 1500 रुपयांवरुन 2100 रुपये करण्याची घोषणा केली होती. मात्र, अद्याप लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळाले नाहीत. याच मुद्यावरुन एक मिम्स शेअर करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी सरकारवर टीका केली आहे. नेमकं काय म्हणाल्या रोहिणी खडसे ते पाहुयात.

 

नेमकं काय म्हणाल्या रोहिणी खडसे?

 

लाडकी बहिण योजनेच्या मुद्यावरुन रोहिणी खडसे यांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे. खडसे यांनी ट्वीटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाने तयार करण्यात आलेलेला एक मीम्स शेअर केला आहे. या मीम्समध्ये अजित पवार यांच्यासोबत रात्री झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की येत्या जूनपासून मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी दरमहा 2100 रुपये देण्याचे त्यांनी मान्य केले आहे.सर्व लाडक्या बहिणांचे अभिनंदन, जय महाराष्ट्र! अशा आशयाचा डोनाल्ड ट्रम्प यांचा एक मीम्स रोहिणी खडसे यांनी शेअर केला आहे.

 

जर राज्यात पुन्हा एकदा आम्ही सत्तेत आलो तर महिलांना या योजनेंतर्गत 2100 रुपये देऊ अशी घोषणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. त्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. महायुती पुन्हा एकदा राज्यात सत्तेत आली. आता 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे लाभार्थी महिलांचं लक्ष लागलं आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याबाबत निर्णय होऊ शकतो असा अंदाज होता, मात्र अजूनही घोषणा करण्यात आलेली नाहीये. या योजनेंतर्गंत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. मात्र आता या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर आर्थिक ताण पडत असल्याचं बोललं जात आहे. तसेच राज्यातील इतर योजनांचा निधी या योजनेकडे वळवला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून सुरू आहे, त्यामुळे आता या योजनेबाबत उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -