Thursday, June 26, 2025
Homeब्रेकिंगदहावी परीक्षेत सहा विषयांत नापास झाल्याने विद्यार्थ्याने गळफास घेऊन संपवले जीवन; ऑनलाईन...

दहावी परीक्षेत सहा विषयांत नापास झाल्याने विद्यार्थ्याने गळफास घेऊन संपवले जीवन; ऑनलाईन निकाल पाहिला अन्..

दहावी परीक्षेत (10th Exam) सहा विषयांमध्ये नापास झाल्याच्या नैराश्यातून एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. राहुल बसाप्पा आयवाळे (१७, रा. काळभैरी रोड, गडहिंग्लज) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्‍याचे नाव आहे.

 

ही घटना काल सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आली.

 

पोलिसांनी सांगितले की, बसाप्पा आयवाळे कुटुंब मूळचे कर्नाटकातील केरुर (ता. चिक्कोडी, जि. बेळगाव) गावचे. अनेक वर्षांपासून हे कुटुंब कामानिमित्त गडहिंग्लजमध्ये (Gadhinglaj) स्थायिक आहे. काळभैरी रोडवरील धबधबा मार्गावर त्यांचे घर आहे. बसाप्पा हे गवंडीकाम व शेती व्यवसाय करतात. त्यांचा मुलगा राहुल हा शहरातीलच एका शाळेत दहावीत होता.

 

दहावी परीक्षेचा निकाल मंगळवारी लागला. राहुलने दुपारी आपला निकाल ऑनलाईन पाहिला. पुन्हा खात्री करण्यासाठी म्हणून शाळेत जाऊनही निकाल तपासला. त्यावेळी त्याला सहा विषयांत नापास झाल्याचे कळाले. त्यानंतर तो घरी आला आणि नैराश्यात राहू लागला. तेव्हा ‘अजून संधी गेलेली नाही, पुन्हा परीक्षा देऊन तू पास होतोस काळजी करू नको’ असे त्याला आई-वडिलांनी सांगितले.

 

दरम्यान, रात्री नऊला तो जेवण करून झोपी गेला. सकाळी सहाला वडील बसाप्पा उठल्यानंतर त्यांना राहुल घरात दिसला नाही. पत्नीला विचारल्यानंतर राहुल शौचास गेल्याचे सांगितले; परंतु तो घरी लवकर आला नाही. यामुळे त्याचा शोध घेतला. घराशेजारच्या नंदू शेटके यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास घेतल्याच्या अवस्थेत तो आढळला. त्याच्या मागे आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. परीक्षेत नापास झाल्याच्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याची फिर्याद वडील बसाप्पा आयवाळे यांनी पोलिसांत दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -