Sunday, July 27, 2025
Homeइचलकरंजीपंचगंगेत एकजण बुडाला; दुसऱ्याला वाचवण्यात यश

पंचगंगेत एकजण बुडाला; दुसऱ्याला वाचवण्यात यश

कार्यासाठी इचलकरंजीत आलेले दोन युवक येथील पंचगंगा नदीत पोहण्यासाठी गेले असताना त्यापैकी देव सुशिल भाट (वय १८, रा. पुणे) हा बुडाला. तर हितेंद्र मनमुख गागडे (वय १७, रा. अहमदाबाद, गुजरात) याला वाचवण्यात यश आले. ही घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली. बुडालेल्या देव भाट याचा शोध सुरू होता, मात्र, अंधारामुळे शोधमोहिम थांबवण्यात आली. याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिसात कोणतीही नोंद नव्हती.

लग्नकार्यानिमित्त भाट व गागडे कुटुंबिय इचलकरंजीत आले होते. गेले काही दिवस शहरात ते वास्तव्यास आहेत. त्यापैकी देव व हितेन हे दोघे शुक्रवारी दुपारी रामलिंग येथे देवदर्शनासाठी गेले होते. त्यानंतर ते पंचगंगा नदी तिरावरील वरद विनायक मंदिरात दर्शनासाठी आले. दर्शन घेतल्यानंतर ते पोहण्यासाठी पंचगंगा नदीत गेले. नदीची पाणी पातळी कमी झाली असल्याने देव, हितेन व त्यांच्यासोबत आलेला विनोद माझे हे तिथेही पात्रात उतरले. विनोद हा वाळूवर थांबला होता. तर देव व हितेनला पोहायला येत असल्यामुळे ते पाण्यात उतरले. देव हा पुढे प्रवाहात सापडल्याने तो बुडू लागला.

हितेन हाही गटांगळ्या खात होता. त्याने आरडाओरडा केल्याने नदीकाठावरील लोकांनी हितेनला पाण्याबाहेर काढले. मात्र, देव प्रवाहात पुढे वाहून गेला. याबाबतची माहिती समजताच महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापनाचे संजय कांबळे, व्हाईट आर्मीचे शाहीर बजरंग जावळे, आनंद पाटाळे, रतन पाटोळे, जीवनमुक्ती सेवा संस्थेचे अनिल | घोडके यांनी घटनास्थळी शोधमोहिम सुरू केली. रात्री उशिरापर्यंत ही मोहिम सुरू होती. मात्र देव मिळून आला नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -