Thursday, June 26, 2025
Homeइचलकरंजीशिरोळ: विहिरीत पोहायला गेलेल्या १३ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

शिरोळ: विहिरीत पोहायला गेलेल्या १३ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

विहिरीत पोहायला गेलेल्या १३ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.२७) दुपारी जयसिंगपूर-नांदणी मार्गावर असलेल्या शिवानंद पिठाची गिरण संभाजीपूर नजीक घडली. नितीन रवींद्र मनकट्टे (वय १३, रा.बावन झोपडपट्टी, शाहूनगर, जयसिंगपूर) असे मृत मुलाचे नाव आहे.याबाबत रात्री उशिरा पोलिसात नोंद करण्यात आली.

 

याबाबत मिळालेली माहिती अशी, जयसिंगपूर येथील शाहूनगरातील शालेय मुले पोहण्यासाठी नांदणी मार्गावर शिवानंद पिठाची गिरण संभाजीपूर जवळ असणाऱ्या विहिरीत गेले होते. यावेळी पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने नितीन मनकट्टे बुडू लागला. ही बाब निदर्शनास आल्यानंतर इतर मुलानी आरडा-ओरड केली. मात्र बुडणारा नितीन नंतर दिसेनासा झाला. घटनेनंतर शिरोळ पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून जिल्हा आपत्ती व्यवस्थापनात कार्यरत असलेल्या वजीर रेस्क्यू फोर्स या संस्थेच्या जवानांना पाचारण केले. जवानांनी तातडीने शोधमोहीम सुरू करून काही वेळातच नितीनचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. या घटनेमुळे जयसिंगपूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेनंतर कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पळवून टाकणारा होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -