Monday, July 7, 2025
Homeब्रेकिंगमहाराष्ट्रासह देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ; मुंबईत 37 तर पुण्यात 42...

महाराष्ट्रासह देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ; मुंबईत 37 तर पुण्यात 42 एक्टिव्ह केसेस, कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण?

महाराष्ट्रासह देशात कोरोना (Corona) रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे बघायला मिळत आहे. राज्यात काल (6 जून) 24 तासांमध्ये 98 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, पुण्यात 42 आणि मुंबईत 37 एक्टिव्ह केसेस (Coranavirus Updates) असल्याचे समोर आले आहेत. शिवाय या दोन्ही महत्त्वाच्या शहरांप्रमाणेच राज्यातील इतरही जिल्ह्यात रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने ही चिंतेची बाब मनाली जात आहे. सध्या महाराष्ट्रात 577 सक्रिय रुग्ण असून प्रशासनाकडून योग्य ती घेतली जात आहे. तर जानेवारी 2025 पासून मुंबईमधील एकूण रुग्ण रुग्णांची 612 वर पोहचली आहे. जानेवारी 2025 पासून आज पर्यंत सद्व्याधीने ग्रस्त असलेले 17 आणि इतर 1 असे एकूण 18 रुग्ण दगावले असल्याची माहिती समोर आली आहे.

 

राज्यातील कोविडच्या रुग्णांची आकडेवारी

पुणे मनपा – 42

मुंबई – 37

ठाणे मनपा- 1

नवी मुंबई मनपा-4

कल्याण मनपा-3

मीरा भायंदर 7

पनवेल मनपा -7

पुणे-2

पिंपरी चिंचवड मनपा-6

सातारा -1

कोल्हापूर मनपा-1

सांगली मनपा -1

छ. संभाजीनगर-1

परभणी मनपा-1

 

परभणीत डॉक्टरला झाली कोरोनाची लागण, आरोग्य

विभागाकडून कोरोना कक्ष सुरू

देशासह महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या वाढलीय. याच अनुषंगाने राज्याच्या आरोग्य विभागाने प्रत्येक जिल्ह्यात कोरोना कक्षाची स्थापना करून तपासण्या करण्याचे निर्देश देण्यात आल्यानंतर परभणी जिल्ह्यात कोरोनाचा कक्ष सुरू करण्यात आला आहे. परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात अँटी जेन तपासण्या केल्या जात आहे. याच तपासण्या दरम्यान पुण्याहून परभणीत आलेल्या एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र कुणीही घाबरून जाण्याचे कारण नाही. कोरोनाचा नवीन व्हेरीयंट हा घातक नसुन याचे सिम्टमस हे नार्मल आहे. परंतु नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे, असे जिल्हा शल्य चिकित्सकांनी आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -