Thursday, June 26, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी : युवतीवर खुनी हल्ला : दुचाकीवर बसण्यास नकार दिल्याचे कारण: दोघावर...

इचलकरंजी : युवतीवर खुनी हल्ला : दुचाकीवर बसण्यास नकार दिल्याचे कारण: दोघावर गुन्हा 

मोटारसायकलवर बसण्यास नकार दिल्याच्या कारणावरुन अज्ञाताने धारदार हत्याराने पोटावर वार केल्याने युवती जखमी झाली आहे. पूजा राजेंद्र चव्हाण (वय २२ रा. वीर गल्ली) असे जखमीचे नांव आहे. ही घटना जवाहरनगर परिसरातील वीर गल्लीकडे जाणाऱ्या बोळात घडली. या प्रकरणी आशा राजेंद्र चव्हाण (वय ४५ रा. वीर गल्ली) यांनी शिवाजीनगर पोलिसात फिर्याद दिली आहे.

 

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, शुक्रवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास आशा चव्हाण व त्यांची मुलगी पूजा या दोघी घरी परतत होत्या. त्यावेळी पूजा ही औषधे घेण्यासाठी थांबली तर आशा चव्हाण या थोडे पुढे गेल्या होत्या. औषधे घेऊन पूजा घराकडे निघाली असताना नॅशनल हायस्कूल व दत्त मंदिर यांच्यामधून वीर गल्लीकडे जाणाऱ्या बोळातून ती जात होती. त्याचवेळी पाठीमागून दुचाकीवरुन तोंडाला मास्क लावलेले दोघेजण आले.

 

पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने पूजा हिच्या डोक्यावर हाताने मारत मोटारसायकलवर बसण्यास सांगितले. परंतु पुजाने नकार दिल्याने त्या व्यक्तीने लोखंडी हत्याराने पुजाच्या पोटावर वार केला आणि डेक्कन चौकाच्या दिशेने मोटारसायकलवरुन निघून गेले. पोटावर वर्मी वार बसल्याने पूजा ही जखमी झाली. या प्रकरणी दोघा अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -