Monday, February 16, 2026
Homeइचलकरंजीइचलकरंजी : घंटागाडी कामगारांचे २५ पासून कामबंद आंदोलन

इचलकरंजी : घंटागाडी कामगारांचे २५ पासून कामबंद आंदोलन

घंटागाडीवरील चालक व मदतनिस यांना किमान वेतन प्रमाणे पगार मिळावा या मागणीसाठी सोमवार ता. २३ पासून बेमुदत उपोषण, मंगळवार ता. २४ रोजी जिल्ह्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने तर बुधवार ता. २५ पासून बेमुदत काम बंद आंदोलन करुन आयुक्त कार्यालयास घेराव घालण्याचा इशारा कामगार नेते ए.बी. पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिला.

 

शहर व परिसरातील घरोघरी जाऊन कचरा उचलण्याचे काम घंटागाडीद्वारे केले जाते. घंटागाडीवरील चालकाला १३,५००रू तर मदतनिसाला १३ हजार रुपये पगार देण्याचे ठरले असताना आता बेकायदेशीरपणे तासावर पगार काढण्याचे काम सुरु आहे. कामगारांना कोणतेही हजेरी कार्ड नाही अथवा कुठलीही कायदेशीर सुविधा दिली जात नाही.

 

प्रॉव्हीडंट फंड, राज्य कामगार आरोग्य विमा (इएसआय) साठी मालकांचा येणारा हिस्सा हा कामगारांच्या पगारातून कापला जातो. त्यामुळे घंटागाडीवरील कर्मचाऱ्याला ४ ते ५ हजार रुपये मिळत आहेत. याबरोबरच वारंवार तक्रार करुनही अधिकारी वर्ग तसेच आयुक्त कोणतीही दखल घेत नसल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तेव्हा कंत्राटी कामगारांना किमान वेतन पगार, प्रॉव्हीडंट फंड, ईएसआय आदी सुविधांसह कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या खात्यावर पगार जमा केला जावा अशी आमची मागणी आहे.

 

तसेच महानगरपालिकेतर्फे कंत्राटी सफाई कर्मचारी नेमण्याची कार्यवाही सुरु केली असून त्यामध्येही टक्केवारी मिळवण्यासाठी अनेकजणांची हालचाल सुरु झाली आहे. या विरोधात आपण आवाज उठवणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. यावेळी सचिन साठे, सचिन आवळे, शक्ती गागडे, विजय कांबळे, संजय जावळे, अंकुश कुरणे आदी कंत्राटी कामगार उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -