मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा (scheme)जून महिन्याचा हप्ता अद्याप पात्र महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. मात्र, आता यासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जून आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्र जमा होण्याची शक्यता आहे. म्हणजेच एकूण ₹3000 रक्कम पात्र महिलांच्या खात्यावर येऊ शकते.
या योजनेच्या(scheme)माध्यमातून दर महिन्याला ₹1500 इतकी रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. मात्र, जूनचा 12वा हप्ता आणि जुलैचा 13वा हप्ता अद्याप न मिळाल्याने लाडक्या बहिणींमध्ये चिंता वाढली होती.
मिळालेल्या माहितीनुसार सरकारकडून या दोन्ही हप्त्यांची रक्कम आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर, म्हणजेच जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा केली जाण्याची शक्यता आहे. सध्या यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली, तरी संकेत मिळत आहेत की याच दिवशी एकत्र पैसे ट्रान्सफर केले जातील.
या पार्श्वभूमीवर सर्व लाभार्थींनी बँक खात्यावर नजर ठेवण्याचं आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, काही अधिकाऱ्यांनी संकेत दिले आहेत की सरकारतर्फे दोन हप्ते वेगवेगळेही दिले जाऊ शकतात.
आतापर्यंत पात्र लाभार्थ्यांना एकूण 11 हप्ते म्हणजे ₹16,500 इतकी रक्कम मिळाली आहे. सध्या 12वा हप्ता (जून) आणि 13वा हप्ता (जुलै) हे दोन हप्ते मिळणे बाकी आहे. त्यामुळे दोन्ही एकत्र मिळाल्यास लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात एकाच वेळी ₹3000 जमा होण्याची शक्यता आहे. या योजनेत दरमहा पैसे मिळणं हा महिलांसाठी आर्थिक आधार ठरतो. त्यामुळे रक्कम वेळेवर मिळणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. शासनाकडून यासंबंधी अंतिम घोषणा लवकरच अपेक्षित आहे.