दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र नदीवेस नाका येथे गुरुवारी श्री गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सेवा केंद्रामध्ये दिवसभर विविध अध्यात्मिक सेवा करण्यात आल्या.
सकाळी आठ वाजता सौ व श्री महेश चव्हाण यांच्या हस्ते आरती करण्यात आली, तर सकाळी साडेदहा वाजताची नैवेद्य आरती माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते करण्यात आली.
गुरूंना वंदन करण्याचा दिवस म्हणून साजरा करण्यात येणार्या गुरुपौर्णिमाच्या निमित्ताने श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात सकाळी 8 वाजता उत्सवाला सुरुवात झाली. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीची षोडशोपचार पूजा करून प्रत्येक सेवेकर्यांनी महाराजांच्या मूर्तीवर वैयक्तिक अभिषेक करत महाराजांना गुरुपद स्विकारण्याची विनंती केली. त्यानंतर दिवसभरात श्री स्वामी समर्थ जप आणि स्वामी चरित्र सारामृताची सेवा करण्यात आली. हजारो भाविक सेवेकर्यांनी गुरुपौर्णिमा उत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता.
दरम्यान सामाजिक उपक्रम म्हणून सेवा केंद्रात आयोजित रक्तदान शिबिरात 108 हुंन अधिक सेवेकर्यांनी रक्तदान केले.
सेवा केंद्रात श्री स्वामी समर्थ महाराजांची त्रिकाल आरती आणि मानवीय समस्येवर ईश्वरीय सेवेतून विनामूल्य मार्गदर्शन सुरू असून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सेवा केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.