Saturday, July 12, 2025
Homeइचलकरंजीआमदारांकडून सुळकूड योजनेला बगल देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचा आरोप

आमदारांकडून सुळकूड योजनेला बगल देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचा आरोप

इचलकरंजी शहर व परिसरात उभारण्यात येणाऱ्या तीन झेडएलडी (अत्याधुनिक सीईटीपी) प्रकल्पामुळे पंचगंगा नदीचे प्रदुषण थांबून इचलकरंजी शहराचा पाणी प्रश्न सुटेल हे आमदारांनी केलेले वक्तव्य तद्वत लवाडीचे व जनतेची दिशाभूल करणारे आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून सुळकूड पाणी योजनेला बगल देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीतर्फे पत्रकार बैठकीत करण्यात आला.

पंचगंगा नदीचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी इचलकरंजी शहर व परिसरात तीन ठिकाणी अत्याधुनिक सीईटीपी प्रकल्प उभारण्यात येणार

आहेत. प्रदुषण रोखण्याच्या दिशेने शासनाने उचललेले पाऊल स्वागतार्ह असल्याचे नमुद करत शशांक बावचकर यांनी गेल्या २५ वर्षात पंचगंगा प्रदूषणमुक्तीच्या केवळ घोषणा झाल्या आणि मंजूर योजना केवळ कागदावरच राहिल्या. असे असताना केवळ काही उद्योगांचे काही एमएलडी पाणी अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे प्रदुषणमुक्त करून पंचगंगेचे प्रदूषण रोखू असे म्हणणे इचलकरंजीकरांची दिशाभूल करण्यासारखे आहे. पाण्यासाठी त्यांनी शहरात शंभर शुध्द पेयजल प्रकल्प, कृष्णा योजना बळकटीकरण, कहीमोळा डोहमधून पाणी उपसा अशा प्रकल्पांना प्राधान्य देत मूळ सूळकूड योजना होणारच नाही याचाच प्रयत्न केला असल्याची टीका केली.

सागर चाळके यांनी सन २०१२ सालापासून

इचलकरंजी शहरासाठी काळम्मावाडी, वारणा अशा वेगवेगळ्या योजना मंजूर झाल्या. परंतु एकही योजना पूर्णत्वास जाण्याच्या दृष्टिकोनातून सरकार अथवा लोकप्रतिनिधींकडून प्रयत्न झाले नाहीत. हे अत्यंत खेदजनक व निषेधार्ह आहे.

दोन महिन्यांपूर्वी शहरात आलेल्या मुख्यमंत्र्यांनीसुध्दा सुळकूड योजनेबाबत कोणतेही स्पष्ट भाष्य केले नाही. याचाच अर्थ सत्ताधारी मंडळी इचलकरंजीचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा या मनःस्थितीत असल्याचे दिसत नाही.

दोन्ही लोकप्रतिनिधींनी सुळकूड योजना पूर्णत्वासाठी शासन दरबारी पाठपुरावा करावा, असे सांगितले. यावेळी प्रकाश मोरबाळे, सयाजी चव्हाण, सदा मलाबादे, भरमा कांबळे, वसंत कोरवी, भाऊसाहेब कसबे, नागेश शेजाळे, प्रकाश सुतार, अमरजित जाधव आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -