Tuesday, July 22, 2025
Homeअध्यात्मShravan 2025 : 24 की 25 जुलै ? यंदा श्रावण महिना कधीपासून?...

Shravan 2025 : 24 की 25 जुलै ? यंदा श्रावण महिना कधीपासून? पहिला श्रावण सोमवार कधी? वाचा

Shravan 2025 : मित्रांनो हिंदू पंचांग शास्त्रानुसार श्रावण महिन्याला धार्मिक महत्त्व खूप आहे. श्रावण महिन्यामध्ये नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन असे अनेक मोठे आनंदाचे सन उत्साहात साजरे केले जातात. याचबरोबर श्रावणातील प्रत्येक सोमवारला विशेष महत्त्व देखील असते.

हिंदू शास्त्रानुसार श्रावण महिन्याला पवित्र महिना म्हणून देखील मानले जाते या महिन्यात अनेक देवी देवतांची पूजा देखील केली जाते तसेच भगवान शंकराला देखील श्रावण महिना खूप प्रिय आहे. यामुळे शंकराला समर्पित असलेल्या अनेक व्रतवैकल्ये उपवास देखील यावेळी केले जातात असे म्हणतात की या काळात भगवान शंकरांची मनोभावी पूजा केल्यास आपल्यावर शंकराची कृपा होते.

यंदाचा म्हणजेच सन 2025 वर्षाचा श्रावण महिना येत्या २५ जुलैपासून महाराष्ट्रात सुरू होत आहे तर 23 ऑगस्ट रोजी श्रावण श्रावण अमावस्येला समाप्ती होणार आहे यंदा एकूण चार सोमवार आले आहेत. ते खालील प्रमाणे…

पहिला श्रावणी सोमवार 28 जुलै 2025, दुसरा श्रावणी सोमवार 4 ऑगस्ट 2025, तिसरा श्रावणी सोमवार 11 ऑगस्ट 2025, चौथा श्रावणी सोमवार 18 ऑगस्ट 2025 या तारखांना श्रावणी सोमवार येणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -