Tuesday, July 22, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी : जुना चंदूर रोड परिसरात गव्याचे दर्शन

इचलकरंजी : जुना चंदूर रोड परिसरात गव्याचे दर्शन

येथील जुना चंदुर रोड परिसरात बुधवारी रात्री गवा रेड्याचे दर्शन झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबतची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने ड्रोनच्या सहाय्याने गव्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो दिसून आला नाही. त्यामुळे पुन्हा शोधमोहिम राबवण्यात येणार

असल्याचे पथकाकडुन सांगण्यात आले.

 

जुन चंदुर रोड, तनंगे मळा परिसरात बुधवारी रात्री शेतात पार्टी करणाऱ्या काहीजणांना हंबरण्याचा वेगळा आवाज आल्यामुळे त्या आवाजाच्या दिशेने जावून पाहिले असता तो गवा असल्याचे स्पष्ट झाले. ही माहिती समजल्यानंतर नागरिकांनी मोबाईलद्वारे इतरांशी संपर्क साधत माहिती देत दक्षतेचा इशारा दिला. त्यामुळे अनेकजण दुचाकी घेऊन गवा पाहण्यासाठी जुना चंदुर मार्गावर आले. त्यावेळी अनेकांना हा गवा निदर्शनास आला. मात्र, नागरिक व वाहनांचा आवाज आणि लाईटमुळे तो गवा पसार झाला.

 

दरम्यान, काहींनी याबाबत महापालिका आपत्ती व्यस्थापन विभाग तसेच वन्य विभागाशी संपर्क साधून माहिती दिली. त्यामुळे रात्रीच वन क्षेत्रपाल नंदकुमार नलवडे, हातकणंगलेचे वनपाल संजय कांबळे, वनरक्षक मंगेश वंजारे, कोल्हापुरच्या वन्यजीव बचाव पथकाचे प्रदीप सुतार, इचलकरंजीतील वन्य जीव संरक्षण संस्थेचे शेखर पवार यांच्यासह सदस्यांचे पथक दाखल झाले. आपत्ती व्यवस्थापनच्या वाहनाचे लाईट लावून या पथकाने ड्रोनच्या सहाय्याने गव्याचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. दोन दिवसांपूर्वी शिरोळ तालुक्यातील घालवाड येथे आढळलेलाच गवा असावा अशी शक्यताही पथकाकडून वर्तवली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -