अल्पवयीन मुलीवर अत्याचार युवकाविरूध्द गुन्हा दाखल
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सम्मेद देसाई (वय २७ रा. शिरगांव ता. वाळवा) असे त्याचे नांव आहे. वा प्रकरणी पिडीत मुलीने फिर्याद दिली आहे.
रांगोळी परिसरातील अल्पवयीन मुलीस संशयित सम्मेद देसाई याने पुस्तक देण्याच्या बहाण्याने एका खोलीत नेले. खोलीचा दरवाजा बंद करून तिच्याशी लगट करत जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी पिडीतेच्या फिर्यादीवरुन सम्मेद देसाई याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.