Friday, July 25, 2025
Homeइचलकरंजीविनयभंगप्रकरणी युवकाविरूध्द गुन्हा दाखल

विनयभंगप्रकरणी युवकाविरूध्द गुन्हा दाखल

अल्पवयीन विद्यार्थीनीचा पाठलाग करत तिला सोबत पळून जाऊया असे म्हणत विनयभंग केल्याप्रकरणी शहापूर पोलिसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साजीद जावेद मुजावर (वय २९, रा. जे. के. नगर) असे त्याचे नांव आहे. या प्रकरणी पिडीत युवतीने फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, साजीद मुजावर हा मागील पंधरा दिवसांपासून दररोज अल्पवयीन विद्यार्थीनीचा तिच्या कॉलेजपर्यंत पाठलाग करीत होता. या प्रकरणी मुलीच्या आई-वडीलांनी जावेद बाला सांगूनही तो पाठलाग करतच होता. २१ जुलै रोजी पुन्हा मुलीचा पाठलाग करत जावेद याने ‘तु माझे सोबत पळून चल’ असे म्हणत विनयभंग केला. या प्रकरणी मुलीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक किशोरी साबळे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -