Saturday, August 23, 2025
Homeब्रेकिंगऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी भारतीय जवानांचा सन्मान, ३६ वायू सैनिकांना वीरता पुरस्कार

ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी भारतीय जवानांचा सन्मान, ३६ वायू सैनिकांना वीरता पुरस्कार

ऑपरेशन सिंदूरमध्ये साहस आणि पराक्रम दाखवणाऱ्या भारतीय वायू सेनेच्या एकूण ३६ वायू सैनिकांना १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त वीरता पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. यात विंग कमांडर अभिमन्यू सिंह यांना शौर्य चक्राने गौरवले जाणार आहे. तसेच अन्य ९ जवानांना वीर चक्र पुरस्काराने गौरवले जाणार आहे. यात ४ ग्रुप कॅप्टन, एक विंग कमांडर, तीन स्क्वाड्रन लीडर आणि एका फ्लाईट लेफ्टनंट यांचा समावेश आहे. तर २६ वायू सैनिकांना वायू सेना मेडल ( गॅलेंट्री ) ने सन्मानित केले जाणार आहे.

 

शौर्य चक्राने सन्मान

– विंग कमांडर अभिमन्यु सिंह

 

वीर चक्र सन्मान होणारे जवान

– ग्रुप कॅप्टन: आर. एस. सिद्धू, मनीष अरोरा, अनिमेष पाटणी, कुणाल कालरा

 

विंग कमांडर: जॉय चंद्रा

 

– स्कॉड्रन लिडर: सार्थक कुमार, सिद्धांत सिंह, रिझवान मलिक

 

– फ्लाईट लेफ्टनंट: ए. एस. ठाकुर

 

सीमा सुरक्षा दलाच्या १६ जवानांचाही गौरव

पाकिस्तानच्या विरोधात ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान अद्वितीय वीरता आणि शौर्याचे प्रदर्शन केल्याबद्दल सीमा सुरक्षा दलाच्या ( बीएसएफ ) १६ कर्मचाऱ्यांनाही वीरता पदकाने गौरवण्यात येणार आहे. ज्या सैनिकांचा यात गौरव होणार आहे त्यात सब इन्स्पेक्टर व्यास देव, कॉन्स्टेबल सुद्दी राभा, अभिषेक श्रीवास्तव, सहायक , सेनानायक आणि कॉन्स्टेबल भूपेन्द्र बाजपेयी यांचा समावेश आहे.

 

ऑपरेशन सिंदूर साठी या जवानांना वीरता पदक( जीएम ) जाहीर करण्याची घोषणा केंद्र सरकारने ७९ व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला करण्यात आली आहे. यातील भारतीय जवानांनी शत्रूचे निगराणी करणारे कॅमेरे नष्ट केले,तर अन्य जवानांनी ड्रोन हल्ल्यांना नाकाम केले.

 

बीएसएफया निमलष्करी दलाच्या जवानांना देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर सैन्यांच्या परिचालन नियंत्रण अंतर्गत नियंत्रण रेषा ( एलओसी ) शिवाय २,२९० किलोमीटर लांबीच्या भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमा ( आयबी ) सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -