पत्नीशी जवळीक साधल्याच्या संशयावरून पतीने आपल्या भावाच्या मदतीने मित्रालाच(murdered)दगडी वरवंट्याने ठेचून ठार मारल्याची थरकाप उडवणारी घटना येथे घडली. या घटनेत विनोद आण्णासो घुगरे वय ३२, रा. गणेशनगर, गल्ली नं. ३ या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी संतोष दशरथ ऊर्फ वसंत पागे ऊर्फ नागणे वय ३८ आणि संजय दशरथ पागे वय ३६, दोघे रा. गल्ली नं. साडेतीन, गणेशनगर, शहापूर, ता. हातकणंगले या दोघांना शहापूर पोलिसांनी अटक केली आहे.
हॅट्रीक’;वडिलांनी पिठाची गिरण चालवून स्वप्नांना दिलं बळ,यशाला घातली गवसणी पत्नीशी जवळीक साधल्याचा संशय हेच या खुनामागील कारण असल्याचे समोर आले आहे. शनिवारी ता. १६ रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेने शहापूर येथील गणेशनगर परिसर हादरून गेला. (murdered)याप्रकरणी मृताची सख्खी बहीण वनिता सचिन बोरगे वय ३५, रा. गणेशनगर, गल्ली नं. ३ यांनी शहापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, मृत विनोद घुगरे आणि संशयित आरोपी संतोष व संजय हे एकमेकांचे जवळचे मित्र होते. तिघेही एकमेकांकडे राहणे-जाणे करीत असत. मात्र, संतोष पागे याच्या पत्नीशी विनोदने जवळीक साधल्याचा संशय संतोषच्या मनात घर करून बसला होता. यावरून यापूर्वीही त्यांच्यात वाद व्हायचे. शनिवारी रात्री विनोद हा संतोष पागे यांच्या घरी आला होता. यावेळी त्यांच्यात पुन्हा वाद झाला. संतापाच्या भरात संतोषने आपल्या भावाला सोबत घेतले आणि दगडी वरवंटा उचलून विनोदच्या डोक्यावर घातला.
यावेळी कपाळ व डोळ्यांजवळील प्राणघातक मारामुळे विनोद जागीच कोसळून मृत झाला. संतोष व संजय पागे दोघे घटनास्थळावरून पळून गेले. घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी घराला कुलूप होते. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने कुलूप तोडून आत प्रवेश केला.घराच्या दुसऱ्या मजल्यावर विनोद याचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला. मृत विनोद याची बहीण वनिता बोरगे यांच्या फिर्यादीवरून संतोष व संजय पागे या दोघांवर गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले. पुढील तपास पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी करीत आहेत.
खून करून संतोष व संजय पागे दोघे घराला कुलूप लावून पसार झाले. दरम्यान, बहीण वनिताने विनोद याला कॉल केला. त्याने कॉल न उचलल्याने तिने विनोदचा मित्र असणाऱ्या संतोष याला कॉल केला. त्याने थेट ‘तुझ्या भावाचा मी आणि संजय याने खून केला आहे’, असे सांगत मोबाईल बंद केला.(murdered)त्यानंतर वनिता ही पतीसह घटनास्थळी आली. तिने तत्काळ शहापूर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि मृतदेह ताब्यात घेतला.