Sunday, August 24, 2025
Homeमहाराष्ट्रहुश्श ! अखेर जोर ओसरणार, आज कुठे, कशी असणार पावसाची स्थिती?; जाणून...

हुश्श ! अखेर जोर ओसरणार, आज कुठे, कशी असणार पावसाची स्थिती?; जाणून घ्या अपडेट्स

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यासह मुंबईलादेखील झोडपून काढणाऱ्या पावसामुळे राज्यातील जनतेचे मोठो हाल झाले होते. सततचा मुसळधार पाऊस, साचलेलं पाणी, चिखल, गोंधळ यामुळे जनजीवन विस्कळीत झालं. अनेक भागात पाणी साचलं, काही ठिकाणी तर इमारतींणध्ये, घरातही पाणी शिरल्याने नागरिकांना मोठा तक्रास सहन करावा लागला. पावसामुळे वाहतूक कोंडी, रेल्वे सेवा ठप्पा यामुळे तर लोकांच्या त्रासात आणखीनच भर पडली. याच मुसळधार पवासाने राज्यात कित्येक बळीही घेतले, त्यामुळे सगळेच लोक पावसाचा जोर ओसरावा याची वाट पहात होते.

 

अखेर आता महाराष्ट्रातील जनतेला थोडा दिलासा मिळाला आहे. संपूर्ण राज्यात आज गुरुवारपासून पावसाचा जोर ओसरणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. गेल्या चार दिवसांच्या तुलनेत बुधवारी काही भागात पावसाचा जोर कमी झाला. अखेर आजपासून सर्वत्र पावसाचा जोर कमी होईल अशी माहिती समोर येत आहे. काही भागात अधूनमधून हलक्या सरी ते मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

 

गेल्या आठवड्यापासून राज्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. काही भागात जनजीवन विस्कळित झाले. मात्र बुधवारी, राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर कमी होता. रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यात अधूनमधून मुसळधार पाऊस कोसळला. मात्र, मुंबई, ठाणे परिसरात बुधवारी पाऊस ओसरला होता. दरम्यान, संपूर्ण राज्यात गुरुवारपासून पावसाचे प्रमाण कमी होणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

 

मुंबई, ठाणे परिसरात बुधवारी पाऊस ओसरला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार संपूर्ण राज्यात गुरुवारपासून पावसाचे प्रमाण कमी होणार असल्याचे समजते. तसेच आसपासच्या जिल्ह्यांतही पावसाचा प्रभाव कमी प्रमाणात दिसेल. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात बुधवारी सकाळी 8.30 ते संध्याकाळी 5.30 पर्यंत 0.4 मिमी, तर सांताक्रूझ येथे 9.8 मिमी पावसाची नोंद झाली. राज्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालीये. मात्र काही भागात अजूनही जनजीवन विस्कळित आहे.

 

सततच्या पावासमुळे रेल्वे सेवेलाही फटका

 

सतत पडणाऱ्या पावसाचा फटका मध्य रेल्वेलाही बसला आहे. आज देखील ठाणे ते मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मध्य रेल्वेच्या गाड्या दहा ते बारा मिनिटे उशिराने धावत आहेत. तसेच ठाणे ते कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्या पाच मिनिटे उशिराने धावत आहे. ठाणे ते वाशी हर्बल लाइन वेळेत लोकल ट्रेन येत आहे . ठाणे रेल्वे स्थानक ठिकानी लोकल पकडण्यासाठी कामावरती जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूकही 10 मिनिटे उशीराने सुरू आहे.

 

विरारमधील 40 सोसायटी अजूनही पाण्याखाली

 

दरम्यान मुसळधार पावासमुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं असून त्याचा अजूनही निचरा झालेल नाही. विरार पश्चिम युनिटेक कॉम्प्लेक्समधील 40 सोसायटी आठ दिवसापासून पाण्याखाली आहेत. तिथे तळ मजल्यात गुडगाभर पाणी साचलं आहे. साचलेल्या पाण्यामुळे जवळपास 500 कुटुंब बेघर झाली असून, स्वतःचे घर असतानाही नातेवाइक, मित्रांच्या घरी रहायला जाण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. गेल्या 20 वर्षांपासून वस्तीने गजबजलेला युनिटेक कॉम्प्लेक्स आता सुनसान झालं आहे. इथ माणसांऐवजी सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे आणि त्यात भूत बंगल्यात सारख्या इमारती उभ्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -