अतुल चंद्रकांत पेटकर यास पूर्वीच्या वादातून लोखंडी गज व काठीने ठार मारणेचा प्रयत्न केलेच्या आरोपातील संशयित संदिप यशवंत गवड, नारायण इंगळे, शुभम विलास गळंकी व राहाल वसंत चव्हाण, निलेश बाळास्ते पाटील या पाचजणांची सवळ पुराव्याअभावी इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश यांनी निर्दोष मुक्तता केली.
६ जुलै २०१७ रोजी रात्री पावणे बारा वाजता भोनेमाळ येथे संशयित आरोपी व मयत झालेला विशाल ठाणेकर या सर्वांनी लोखंडी गज व काठीच्या सहाय्याने अतुल चंद्रकांत पेटकर बांचेवर हल्ला चढवून त्याला ठार मारणेचा प्रयत्न केला म्हणून शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. त्यानंतर सदर खटल्याची सुनावणी सत्र न्यायालय इचलकरंजी येथे सुरु झाली. रात्रीचा अंधार आहे, ओळख परेड नाही व फिर्यादी जखमी याच्या जवाचात विसंगती आहे. बहुतांश संशयितांची नावे फिर्यादीमध्ये नमूद नाहीत हा युक्तिवाद संशयीत आरोपीचे अॅड. मेहबूब बाणदार बांनी मांडला. सदर युक्तिवाद ग्राहय मानून न्यायालयाने सर्व संशयितांची निर्दोष मुक्तता केली.