Friday, October 31, 2025
HomeयोजनाPost Office ची शानदार स्कीम, फक्त व्याजामधून होणार 12 लाख रुपयांपेक्षा जास्तची...

Post Office ची शानदार स्कीम, फक्त व्याजामधून होणार 12 लाख रुपयांपेक्षा जास्तची कमाई

पोस्ट ऑफिसमध्ये सीनियर सिटीजन सेविंग्स स्कीममध्ये (SCSS) 30 लाख रुपयापर्यंत गुंतवणूक केली जाऊ शकते. यावर वर्षाला सध्या 8.2 टक्के व्याज मिळतं. याचा अर्थ दर महिन्याला जवळपास 20,500 रुपये थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतील. वर्षाला 2.46 लाख रुपये तुम्हाला व्याजामधून मिळतील. म्हणजे पाच वर्षात फक्त व्याजामधून तुम्ही 12 लाख 30 हजार रुपयाची कमाई करु शकता.सामान्यपणे बँका एफडीमधून 6-7% व्याज देतात. यात SCSS मध्ये 8.2% फिक्स रिटर्न मिळत आहे. ते ही सरकारी गॅरेंटी सोबत. म्हणजे कुठलीही रिस्क नाही. ही स्कीम खासकरुन त्या लोकांसाठी बनवली आहे, ज्यांना रिटायरमेंट नंतर स्थिर आणि सुरक्षित इनकम हवं आहे.

 

आधी या योजनेत केवळ 15 लाख रुपये गुंतवणूकीची परवानगी होती. आता सरकारने ही रक्कम दुप्पट करुन 30 लाख रुपये केली आहे. यात निवृत्त लोकांना जास्त फायदा मिळू शकतो. तुम्ही पती-पत्नी मिळून खातं उघडत असाल, तर हा फायदा आणखी वाढू शकतो.SCSS मध्ये ज्या पैशांची तुम्ही गुंतवणूक करता, त्यावर सरकारची पूर्ण गॅरेंटी असते. म्हणजे तुमचं कॅपिटल पूर्णपणे सुरक्षित आहे. व्याजही वेळेवर मिळेल. पाच वर्षानंतर तुम्हाला वाटलं तर तुम्ही पुढे स्कीम चालू ठेऊ शकता. तुम्हाला फायदा मिळत राहीलं.

 

SCSS मध्ये गुंतवणूक करुन कलम 80C अंतर्गत टॅक्स बचतीचा फायदा उचलू शकता. व्याजावर टॅक्स जरूर द्यावा लागतो. पण त्याचं प्रमाण कमी असतं. योग्य प्लानिंगसह ही स्कीम तुमच्या रिटायरमेंटला अजून मजबूत बनवते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -