Friday, October 31, 2025
Homeयोजनालाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट; आता E-kyc केलेल्या बहिणींनाच मिळणार लाभ, दिवाळीतील...

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट; आता E-kyc केलेल्या बहिणींनाच मिळणार लाभ, दिवाळीतील हप्ता पडणार लांबणीवर

माझी लाडकी बहीण योजनेत अविवाहित लाभार्थींना वडिलांची व विवाहितांना पतीची ई-केवायसी आवश्यक वार्षिक उत्पन्न पडताळणीसाठी ई-केवायसी अनिवार्य

 

ई-केवायसी प्रक्रियेमुळे दिवाळीचा लाभ उशिरा मिळण्याची शक्यता

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी (Mazi Ladki Bahin Yojana) लाभार्थींची ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. सरकारच्या नव्या निर्णयानुसार योजनेतील अविवाहित लाभार्थींना वडिलांची तर विवाहितांना त्यांच्या पतीची देखील ई- केवायसी (Solapur Ladki Bahin Yojana) करावी लागणार आहे. त्यातून लाभार्थी कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाची पडताळणी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर दिवाळीत मिळणारा लाभ लांबणीवर पडणार आहे.

 

विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीर झालेल्या लाडकी बहीण योजनेसाठी राज्यभरातील दोन कोटी ५९ लाख महिलांनी अर्ज केले. त्यात सोलापूर जिल्ह्यातील ११ लाख नऊ हजार महिला होत्या. मार्च २०२५ पासून योजनेतील लाभार्थींची निकषांच्या आधारे चाळणी सुरू झाली. शेवटच्या टप्प्यात आता राज्य सरकारने ई-केवायसी बंधनकारक केले आहे.

 

त्यातून वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असलेले लाभार्थी शोधले जाणार आहेत. नव्या निर्णयानुसार लाभार्थी महिलेच्या उत्पन्नासह वडील किंवा पतीचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक असल्यास त्या महिलेचा लाभ बंद होईल. लाभार्थी महिलेचा विवाह झालेला असल्यास पतीचे आणि विवाह झालेला नसल्यास त्यांच्या वडिलांच्या वार्षिक उत्पन्नाची पडताळणी त्यातून केली जाणार आहे.

 

ई-केवायसी करण्याची प्रक्रिया अशी…

 

लाभार्थी महिलांना https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेब पोर्टलवर जाऊन ई-केवायसी करायची आहे.

 

या प्रक्रियेत लाभार्थींना त्यांची काही महत्त्वाची कागदपत्रे, माहिती पुन्हा अपलोड करावी लागेल.

 

लाभार्थीचे नाव, पत्ता, शिधापत्रिका (रेशन कार्ड) क्रमांक, उत्पन्न व आधार कार्डची माहिती द्यावी लागेल.

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या पेजवर लाभार्थी आधार क्रमांक नोंदवावा लागेल. यानंतर कॅप्चा कोड नोंदवा. त्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी संमती द्यावी लागते.

 

आधार प्रमाणीकरण संमतीमधील मजकूर वाचून ‘मी सहमत आहे’ या पर्यायावर वा. त्यानंतर ‘ओटीपी’ पाठवा हा पर्याय निवडा. आधार लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी मिळेल, तो टाकून सबमिट केल्यावर ई-केवायसी पूर्ण होईल.

 

पडताळणीचे चार टप्पे

 

लाभार्थी कुटुंबाकडे चारचाकी वाहन

 

इतर वैयक्तिक योजनांचा लाभ घेणारे लाभार्थी

 

वयाची अट न पाळणारे लाभार्थी

 

उत्पन्नाची मर्यादा पडताळण्यासाठी ई-केवायसीचे बंधन

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांनुसार सर्व लाभार्थींची पडताळणी सुरू आहे. आता प्रत्येक पात्र लाभार्थींनी ई-केवायसी करायची असून त्यासाठी ऑक्टोबरअखेर पर्यंत मुदत आहे. अविवाहित लाभार्थींनी वडिलांची तर विवाहितांनी पतीची देखील ई-केवायसी करायची आहे. त्याशिवाय लाभ मिळणार नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -