एखाद्या मुलीने घरच्यांच्या इच्छेविरुद्ध जाऊन लग्न केलं किंवा प्रियकरासोबत पळून गेली तर ती आपल्यासाठी मेली असं तिचे आई-वडील म्हणतात. पण याच्याही पुढे जाऊन बेळगावच्या (Belgaum) एका दाम्पत्याने टोकाचा निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे. मुलगी तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी श्राद्ध घातलं, नातेवाईकांना घरी बोलावून पंगतीही वाढल्याची धक्कादायक घटना घडली.
बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील एका गावात 19 वर्षीय तरुणीचे 29 वर्षीय तरुणावर प्रेम होतं. घरच्यांच्या इच्छेविरुद्ध जाऊन ती मुलगी प्रियकरासोबत पळून गेली. त्यानंतर दुःखी झालेल्या आई-व
फोटो पूजन करुन श्राद्ध घातलं
मुलगी तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्यामुळे आपण केलेल्या संस्काराला धक्का बसल्याचं मत आई-वडिलांचे बनले. त्यानंतर आमची मुलगी मेली असं सांगत कुटुंबीयांनी त्या मुलीचे फोटो पूजन केलं आणि श्राद्ध घातलं. याशिवाय मुलीच्या फोटोसमोर मृत व्यक्तीला नैवेद्य ठेवतात त्याप्रमाणे नैवेद्य ठेवला. या कार्यक्रमासाठी त्यांनी नातेवाईक आणि जवळच्या लोकांना आमंत्रित केलं. यावेळी रुचकर जेवणाच्या पंगतीही उठल्या.
घरासमोर बॅनर लावला
मुलगी पळून गेल्यानंतर कुटुंबीयांनी आधी पोलिसात तक्रार दिली. पण मुलगी प्रौढ होती आणि ती तिच्या इच्छेने प्रियकरासोबत गेली. यामुळे कुटुंबीयांना धक्का बसला. त्यानंतर कुटुंबीयांनी हे टोकाचं पाऊल उचललं आणि मुलगी आपल्यासाठी मेल्याचं जाहीर केलं.
मुलीच्या कुटुंबीयांनी घरासमोर भावपूर्ण श्रद्धांजलीचा बॅनर लावला. मुलगी जिवंत असतानादेखील बापाने तिचं श्राद्ध घातल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.