अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री, राहुरीचे भाजपाचे आमदार शिवाजीराव कर्डिले (वय ६६) यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे.
आमदार कर्डिले यांना पहाटे त्रास जाणवू लागला. त्यांना अहिल्यानगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी नगर -नेवासा आणि राहुरी मतदार संघातून विधानसभेचे प्रतिनिधित्व केले होते. ते सहाव्यांदा आमदार होते.
शिवाजीराव कर्डिले यांच्या अकाली निधनानं धक्का
राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांचं अल्पशा आजाराने निधन झाल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांचं असं अकाली जाण्याने त्यांचं कुटुंब आणि मतदारसंघासह सर्वांनाच धक्का बसला आहे. अनेकदा आमदार, राज्यमंत्री, अहिल्यानगर जिल्हा बँकेचे चेअरमन आदी विविध पदांवर त्यांनी केलेलं लोकाभिमुख कार्य कायम स्मरणात राहील. हे दुःख पचवण्याची ताकद त्यांच्या कुटुंबियांना मिळो, ही प्रार्थना! आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत असं सांगत आमदार रोहित पवार यांनी त्यांना भावपूर्व श्रद्धांजली वाहिली आहे.