Saturday, October 18, 2025
Homeमहाराष्ट्रसुट्ट्यांची दिवाळी; सलग सहा दिवस शासकीय कार्यालये बंद

सुट्ट्यांची दिवाळी; सलग सहा दिवस शासकीय कार्यालये बंद

दिवाळीनिमित्त सोलापुरात यंदा सहा दिवस सलग सुट्टी राहणार आहे. सुट्ट्यांच्या या दिवाळीने दहा दिवस कामकाज खोळंबण्याची शक्यता आहे. शुक्रवार (दि.17) पासून दिवाळीस सुरुवात होत आहे.

 

त्यानंतर शनिवारपासून शासकीय कार्यालयांना सुट्टी आहे. शनिवार व रविवार शासकीय सुट्टी, सोमवारी नरक चतुर्दशी दिवशी सोलापूर जिल्हाधिकारी यांनी सुट्टी दिली आहे. मंगळवारी लक्ष्मीपूजन, तसेच बुधवारी पाडव्या दिवशी राज्य शासनाची सुट्टी आहे. लाडक्या बहिणींमुळे राज्य शासनाने यंदा भाऊबीजेला सुट्टी जाहीर केली आहे.

 

त्यामुळे शनिवारपासून गुरुवारपर्यंत सलग सहा दिवस शासकीय सुट्टी राहणार आहे. यामुळे शासकीय कर्मचारी खूश झाले आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांची ही दिवाळी सुट्ट्यांची दिवाळी होणार आहे. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, महापालिका तसेच राज्य शासनाच्या सर्व विभागांना या सहा दिवसांत सुट्टी असणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -