Thursday, October 30, 2025
Homeब्रेकिंगFASTag वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 'हे' एक छोटस काम केल नाही तर आपोआप...

FASTag वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ‘हे’ एक छोटस काम केल नाही तर आपोआप बंद होणार फास्टॅग, शासनाचे नवीन नियम जाहीर

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारित किंवा राज्य शासनाच्या रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारित येणाऱ्या महामार्गावरून प्रवास करताना आपल्याला एक ठराविक रक्कम टोल म्हणून भरावी लागते.

 

लांब पल्ल्याचा प्रवास करायचा असेल तर एक मोठी रक्कम टोल म्हणून द्यावी लागते. जर गाडीला FASTag असेल तर टोलची रक्कम निम्म्याने कमी होते.

 

FASTag नसलेल्या वाहनांकडून अधिकचा टोल वसूल केला जातो. दरम्यान जर तुम्हीही वाहन चालवत असाल आणि FASTag चा वापर करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. शासनाकडून आता फास्टॅगच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे.

 

काही लोकांचे फास्टॅग आता 31 ऑक्टोबर नंतर बंद पडणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार शासनाने दिलेल्या या मुदतीत जर तुम्ही तुमच्या वाहनाचं नवीन नो युवर व्हेइकल (Know Your Vehicle / KYV) व्हेरिफिकेशन केले नाही, तर तुमचा FASTag आपोआप बंद होणार आहे.

 

म्हणजेच ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर आता तुम्हाला टोल प्लाजावर दुप्पट टोल भरावा लागणार आहे. यामुळे वाहने चालकांनी वेळेत आपल्या वाहनांचे नो युवर व्हेइकल व्हेरिफिकेशन पूर्ण करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे. टोल सिस्टम मध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि गैरव्यवहार थांबवण्यासाठी शासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

 

पण शासनाच्या या निर्णयानंतर आता पुन्हा एकदा सर्वसामान्य वाहनचालकांना पडताळणीच्या प्रक्रियेतून जावे लागणार आहे. यामुळे शासनाचा निर्णय कौतुकास्पद असला तरी देखील हा निर्णय सर्वसामान्य लोकांसाठी मनस्ताप देणारा ठरणार आहे.

 

खरेतर सद्यस्थितीला काही लोक एकच फास्टटॅग वेगवेगळ्या गाड्यांसाठी वापरताना दिसत आहेत. यामुळे सिस्टीम मध्ये एक मोठा बग दिसून आला आहे. याच कारणामुळे आता नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियानं (NHAI) केवायव्ही ही व्हेरिफिकेशन प्रक्रिया अनिवार्य केली आहे.

 

थोडक्यात शासनाची ही वेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक FASTag आता केवळ त्याच वाहनाशी जोडलेला असेल, ज्यासाठी तो जारी करण्यात आला आहे. म्हणजेच प्रत्येक वाहनाला स्वतःचा युनिक फास्ट टॅग राहणार आहे.

 

यामुळे लहान वाहनांवर मोठ्या वाहनांसाठी असलेल्या FASTag चा वापर होणार नाही, याचीही खात्री केली जाणार आहे. विशेष म्हणजे प्राधिकरणाने ही प्रक्रिया फारच सोपी केली आहे. फास्ट टॅग व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ज्या बँकेतून FASTag जारी झाल आहे, त्या बँकेच्या वेबसाइट किंवा ॲपवर जाऊन प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

 

यासाठी तुम्हाला फक्त Know Your Vehicle किंवा Update KYV या ऑप्शन वर जाऊन वेरिफिकेशन पूर्ण करावे लागेल. व्हेरिफिकेशन ची प्रक्रिया पूर्ण करताना तुम्हाला RC, ओळखपत्र, पासपोर्ट फोटो, गाडीचे फोटो असे काही आवश्यक कागदपत्रं अपलोड करावी लागतील.

 

तसेच ओटीपी व्हेरिफिकेशन सुद्धा पूर्ण करावं लागेल. एकदा ही प्रक्रिया पूर्ण झाली की तुमचा टॅग Active and Verified असा दिसणार आहे. पण जे वाहनचालक ही प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत त्यांचा फास्टटॅग बंद होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -