सरकारी कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. ओएनजीसी म्हणजे ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड. या कंपनीत सध्या अप्रेंटिसशिप पदांसाठी भरती निघाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ नोव्हेंबर २०२५ आहे.
ओएनजीसीमध्ये एकूण २६२३ अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
ओएनजीसीमधील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १६ ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे. तुम्ही ongcindia.com या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांची यादी २६ नोव्हेंबर २०२५ रोजी जाहीर केली जाईल.
पात्रता
ओएनजीसीमधील या नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असणार आहे. १०वी पास, आयटीआय आणि ग्रॅज्युएट असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.
ओएनजीसीमधील अप्रेंटिस पदासाठी १८ ते २४ वयोगटातील उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
ग्रॅज्युएट अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस, ट्रेड अप्रेंटिस (१०वी,१२वी पास), ट्रेड अप्रेंटिस (१ वर्षीय आयटीआय), ट्रेड अप्रेंटिस (दोन वर्षीय आयटीआय) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी १२३०० रुपये स्टायपेंड मिळणार आहे. डिप्लोमा अप्रेंटिस पदासाठी १०९०० रुपये, ट्रेड अप्रेंटिस पदासाठी ८२०० ते १०५६० रुपये स्टायपेंड दिली जाणार आहे.
अर्ज कसा करावा? (ONGC Recruitment Application Process)
या नोकरीसाठी अर्ज करताना ongcindia.com या वेबसाइटवर जा.
यानंतर होमपेजवर दिलेल्या अर्जाच्या लिंकवर क्लिक करा.
यानंतर रजिस्ट्रेशन करा.
त्यानंतर अॅप्लिकेशन फॉर्म भरा. यानंतर फॉर्म योग्य भरला की नाही हे चेक करा.
यानंतर फॉर्म डाउनलोड करा आणि प्रिंट आउट काढून ठेवा.



