Friday, December 12, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी: कर्जाची रक्कम फायनान्स कंपनीत न भरता अपहार

इचलकरंजी: कर्जाची रक्कम फायनान्स कंपनीत न भरता अपहार

खासगी फायनान्स कंपनीत कर्जापोटी जमा करण्यासाठी घेतलेले 26 लाख 54 हजार 443 रुपये कंपनीत न भरता या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी गावभाग पोलिसांनी सहाजणांवर गुन्हा दाखल केला.

 

इंडसइंड बँकअंतर्गत भारत फायनान्शिअल इन्क्लुजन या खासगी कंपनीतील क्रेडिट मॅनेजर अक्षय विश्वास देवकुळे (रा. गुळवंची, ता. जत), तसेच फिल्ड असिस्टंट सोहेल सलीम जमादार (वय 24, रा. डॉ. आंबेडकर नगर मिरज), सुदर्शन आण्णा सुतार (24, रा. हारोली, ता. शिरोळ), ओंकार भीमराव यादव (26, रा. आभार फाटा चंदूर), प्रणव दिलीप कांबळे, (रा. साईनाथ कॉलनी उजळाईवाडी), दिग्विजय अनिल कांबळे (22, रा. खोत बेघर वसाहत उदगाव, ता. शिरोळ) अशी त्यांची नावे आहेत. याची फिर्याद बँच क्रेडिट मॅनेजर महेश विराप्पा पाटील (22, रा. जंबगी, ता. अथणी) यांनी दिली आहे. याची माहिती पो. नि. महेश चव्हाण यांनी दिली. यातील चौघांना अटक केली आहे.

 

येथील सांगली रस्त्यावर इंडसइंड बँकअंतर्गत भारत फायनान्शिअल इन्क्लुजन या कंपनीची शाखा आहे. या कंपनीत सोहेल जमादार, सुदर्शन सुतार, ओंकार यादव, प्रणव कांबळे, दिग्विजय कांबळे हे फिल्ड असिस्टंट आणि अक्षय देवकुळे हे क्रेडिट मॅनेजर आहेत. त्यांनी भारत फायनान्शियल इन्क्लुजन इचलकरंजी शाखेतील 191 कर्जदारांकडून मुदतपूर्व कर्ज घेतलेले आहे. या कर्जापोटी या सर्वांकडून 1 जानेवारी 2023 ते 8 एप्रिल 2025 या कालावधीत हप्ता भरण्यासाठी दिलेले 26 लाख 54 हजार 443 रुपये त्यांच्या खात्यात जमा न करता वैयक्तिक कारणांसाठी वापरून कंपनीची फसवणूक केल्याचे कंपनीच्या लेखापरीक्षणात निदर्शनास आले आहे.

 

दोन दिवस पोलिस कोठडी

 

यापैकी सोहेल जमादार, सुदर्शन सुतार, ओंकार यादव, दिग्विजय कांबळे या चौघांना अटक केली आहे. चौघांनाही दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली, तर प्रणव कांबळे व अक्षय देवकुळे या दोघा संशयितांचा शोध सुरू असल्याची माहिती उपनिरीक्षक गोविंद कोळेकर यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -