Tuesday, February 10, 2026
Homeमहाराष्ट्रUPI New Rules: UPIचे नियम बदलले! गुगल पे, फोन पे आणि पेटीएम...

UPI New Rules: UPIचे नियम बदलले! गुगल पे, फोन पे आणि पेटीएम युजर्सवर होणार परिणाम

गुगल पे, फोन पे आणि पेटीएमवर होणार परिणामडिजिटल व्यव्हार अधिक जलद आणि सुरक्षित होणार

सध्या सर्वकाही डिजिट झाले आहे. ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांची संख्या तर दिवसेंदिवस वाढत आहेत.

 

यूपीआयद्वारे अनेकजण पेमेंट करतात. दरम्यान, आता यूपीआयच्या नियमात महत्त्वाचे बदल झाले आहे. फेब्रुवारी २०२६ पासून हे नवीन नियम लागू झाले आहे. याचा परिणाम थेट गुगल पे, फोन पे आणि पेटीएम युजर्सवर होणार आहे. हे नवीन नियम डिजिटल ट्रान्झॅक्शन अधिक सुरक्षित होण्यासाठी लागू करण्यात आले आहेत.

 

यूपीआय ट्रान्झॅक्शन होणार जलद

 

यूपीआयत्या नवीन नियमानुसार यूपीआय ट्रान्झॅक्शन अधिक जलद गतीने होणार आहे.API रिस्पॉन्स जास्तीत जास्त १० सेकंदात पेमेंटचे काम करणार आहे. याआधी प्रोसेसला ३० सेकंदाचा वेळ लागायचा. आता हा बदल करण्यात आला आहे.

 

API म्हणजे अॅप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. ही एक डिजिटल सिस्टीम आहे. याद्वारे तुम्ही यूपीआयवरुन बँक बॅलेंस चेक करु शकतात. याचसोबत बँकेला पैसे पाठवल्यावर मेसेज येणार आहे.

 

वाढत्या डिजिटल पेमेंटला सपोर्ट

 

आता यूपीआयद्वारे पेमेंट करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यामुळे रियल टाइम प्रोसेसिंग अधिकच मजबूत करणे गरजेचे आहे. आता नवीन नियमानुसार गुगल पे, फोन पे किंवा पेटीएमवर ट्रान्झॅक्शन करतानाच्या समस्या कमी होतील.

 

सुरक्षित पेमेंट

 

नवीन यूपीआय नियमांमध्ये सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. हाय वॅल्यु ट्रान्झॅक्शनसाठी व्हेरिफिकेशन होईल. तसेच सबस्क्रिप्शन किंवा ऑटो डेबिट रिकरिंट पेमेंट मॅनेज किंवा रद्द करणे सोपे होणार आहे.

 

निष्क्रिय UPI ID साठी व्हेरिफिकेशन

 

जो यूपीआय आयडी बऱ्याच दिवसापासून वापरला नाही त्यावरुन पेमेंट किंवा त्या अकाउंटला पेमेंट करणे रोखणार आहे. पेमेंट करण्यासाठी युजर्सला री व्हेरिफिकेशन करणे गरजेचे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -